बांग्लादेश हिंसाचाराने धगधगत असताना 'क्राऊन प्रिन्स'ची एन्ट्री!

कोण आहेत तारिक रहमान?

    26-Dec-2025   
Total Views |
Tarique Rahman
 
मुंबई : ( Tarique Rahman ) बांग्लादेशात एकीकडे हिंदूंविरोधात हिंसाचार होत असताना दुसरीकडे तारिक रहमान हे नाव चर्चेत आले आहे. इस्लामी संघटना जमात-ए-इस्लामीच्या पाठबळावर चालणाऱ्या कट्टरपंथी बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (बीएनपी)चे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान आगामी राष्ट्रीय निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर ढाक्याला परतलेत. ते जवळपास १७ वर्षे लंडनमध्ये स्वयंनिर्वासित जीवन जगत होते. बांगलादेशी राजकारणातील 'क्राऊन प्रिन्स' म्हणून संबोधले जाते.
 
तारिक रहमान हे बांगलादेशचे माजी राष्ट्राध्यक्ष व लष्करप्रमुख झियाउर रहमान आणि तीन वेळा पंतप्रधान राहिलेल्या खालिदा झिया यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. खालिदा झिया बीएनपीच्या अध्यक्षा आहेत. २००० च्या दशकात तारिक हे बीएनपी मधील प्रभावशाली नेते आणि आईचे राजकीय वारस म्हणून ओळखले जाऊ लागले. मात्र २००७ मध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेत त्यांना अटक झाली आणि जवळपास १८ महिने तुरुंगात ठेवण्यात आले. ३ सप्टेंबर २००८ रोजी जामिनावर सुटल्यानंतर ते उपचारासाठी लंडनला गेले आणि तेव्हापासून तिथेच आहेत.
 
२०१६ मध्ये बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने त्यांना २० कोटी टाका दंड आणि ७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांच्यावर २.५ दशलक्ष डॉलरची अफरातफर केल्याचा आरोप होता. २०१८ मध्ये ढाक्यातील विशेष न्यायालयाने २१ ऑगस्ट २००४ च्या ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्या हल्ल्यात २४ जण ठार झाले होते आणि शेख हसीना जखमी झाल्या होत्या. मात्र शेख हसीना सरकार पडल्यानंतर, बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाने तारिक यांना निर्दोष ठरवले.
 
हेही वाचा : गाझासाठी मेणबत्त्या पेटवता! हिंदूंना मारले तेव्हा गप्प बसता! जर का मी रोहिंग्या बांगलादेशींना हुसकावलं, तेव्हाही गप्प बसा अन्यथा...!
 
हिंदू धर्माचा अपमान
 
तारिक रहमान यांनी उघडपणे हिंदू धर्माचा अपमान केला आहे. भारतविरोधी आणि हिंदूविरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तारिक रहमान यांचा बांगलादेशात परत येणे, देशातील हिंदूंवरील वाढते हल्ले, राजकीय अस्थिरता आणि भारताशी तणाव या सगळ्यांशी एकाच वेळी जुळून येत आहे.
 
बीएनपी सत्तेत आली तर...
 
बांग्लादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस आणि तारिक रहमान या दोघांची विचारधारा तसेच राजकीय ओळख वेगळी आहे. शेख हसीना आणि अवामी लीगला सत्तेतून हटवणे हा जरी दोघांमधील समान धागा असला तरी, बीएनपीला सत्ता हवी आहे. जर बीएनपी सत्तेत आली तर युनूस यांची भूमिका मर्यादित होण्याची शक्यता आहे.
 
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक