मुंबई : (PM Narendra Modi) उत्तर प्रदेशातील लखनौ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुरुवारी २५ डिसेंबर रोजी ‘राष्ट्रप्रेरणा स्थळ’चे लोकार्पण करण्यात आले. लोकार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जनसभेला संबोधित केले. राष्ट्र प्रेरणा स्थळ हे भारताला आत्मसन्मान, एकता आणि अंत्योदयातून सेवेचा मार्ग दाखविणाऱ्या विचारांचे प्रतीक आहे, असे त्यांनी सांगितले. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी हे स्थळ सर्वांना प्रेरणा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.(PM Narendra Modi)
काय म्हणाले पंतप्रधान?
"२५ डिसेंबर हा दिवस भारतासाठी विशेष महत्त्वाचा असून, भारतरत्न मदनमोहन मालवीय आणि अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती याच दिवशी येते, भारताची ओळख, एकता आणि स्वाभिमानाचा पाया या दोन्ही महान नेत्यांनी रचला", असे मोदी म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. सुशासन, गरीबी निर्मूलन, आणि बँकिंग-विमा सुविधा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा मार्ग असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. भाषणाच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी देशवासीयांना नाताळच्या शुभेच्छाही दिल्या.(PM Narendra Modi)
या कार्यक्रमाला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त हा भव्य उपक्रम राबविण्यात आला आहे.
६५ एकर परिसरात उभारलेल्या या प्रेरणास्थळात डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे ६५ फूट उंच कांस्य पुतळे स्थापित करण्यात आले आहेत. तसेच या महान राष्ट्रनेत्यांच्या कार्य आणि विचारांचे प्रदर्शित करणारे आधुनिक वास्तुसंग्रहालयही येथे उभारले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तिन्ही नेत्यांच्या पुतळ्यांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले आणि राष्ट्रनिर्मितीतील त्यांच्या योगदानाचे स्मरण केले.(PM Narendra Modi)
राष्ट्र प्रेरणा स्थळची वैशिष्ट्ये
२३० कोटी रुपयांच्या खर्चातून उभारलेले ६५ एकरांवरील हे राष्ट्र प्रेरणा स्थळ
वसंत कुंज पार्कमध्ये ६५ फूट उंच कांस्य (ब्रॉन्झ) मूर्ती उभारण्यात आल्या आहेत
भाजप–जनसंघाच्या महान व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित संग्रहालयाचे उद्घाटनही होणार|
या उद्यानात २ लाख लोकांची क्षमता असलेली भव्य रॅली व्यवस्था आणि मोठे व्यासपीठ
मनोरंजन केंद्र, ध्यान केंद्र, विश्रांती केंद्र, योग केंद्र आणि कॅफेटेरियाही उपलब्ध
संग्रहालय कसे आहे?
कमळाच्या आकारातील हे संग्रहालय ९८,००० चौरस फूट क्षेत्रात पसरलेले
प्रसिद्ध शिल्पकार श्रीराम सुतार आणि मंटूराम यांनी या मूर्ती व संग्रहालयाची निर्मिती केली
भाजपच्या महान नेत्यांच्या मूर्तींसोबत लेझरद्वारे प्रोजेक्टरवर माहिती सादर केली जाईल
लोकांना चालण्यासाठी व फेरफटका मारण्यासाठी १.७ किमी लांबीचा सिंथेटिक ट्रॅक
प्रेरणा गॅलरी – १ : श्यामा प्रसाद मुखर्जी
जनसंघाचे संस्थापकांपैकी एक असलेल्या श्यामा प्रसाद मुखर्जी यांची संपूर्ण राजकीय वाटचाल या गॅलरीत दाखवली आहे. जम्मू–काश्मीर संदर्भातील त्यांची भाषणे, 3D चित्रे, डिजिटल किऑस्क, अॅनिमेशन तंत्रज्ञान, इंटरॲक्टिव्ह प्रदर्शन येथे समाविष्ट आहेत.
प्रेरणा गॅलरी – २ : दीनदयाळ उपाध्याय
या गॅलरीत पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन, विचारसरणी आणि एकात्म मानववादाचे तत्त्वज्ञान मांडले आहे. त्याचबरोबर राष्ट्राविषयी त्यांची दृष्टी येथे पाहायला मिळेल. टच टेबल व प्रोजेक्शन स्क्रीन, सविस्तर इन्फोग्राफिक्स, आकर्षक सेट डिझाइन, अॅनिमेशन सादरीकरण असे आधुनिक तंत्रज्ञान याठिकाणी वापरले आहे.
प्रेरणा गॅलरी – ३ : अटल बिहारी वाजपेयी
भारतरत्न व माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची संपूर्ण जीवनगाथा आणि त्यांची ओजस्वी भाषणे येथे सादर केली आहेत. अटलजींची संपूर्ण जीवनकथा; कवी, पत्रकार आणि नेते म्हणून त्यांचे कार्य, राम जन्मभूमी विभाग, डिजिटल अल्बम, सन्मान व पुरस्कारांचे प्रदर्शन अशा विविध गोष्टी येथे पाहायला मिळतील.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\