ऊर्जा कंपन्यांच्या वाहनचालकांसाठी महापारेषण तर्फे लोणावळ्यात कार्यशाळा

Total Views |
Mahatransco
 
मुंबई : ( Mahatransco ) महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीच्या (महापारेषण) वतीने वाहनचालकांसाठी दोन दिवसीय कार्यशाळा लोणावळा येथील हॉटेल रिदममध्ये घेण्यात आली. या कार्यशाळेचे उदघाटन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ सूत्रधारी कंपनीचे संचालक (स्वतंत्र) विश्वास पाठक यांच्या हस्ते झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा महापारेषणच्या कार्यकारी संचालक (मानव संसाधन) सुचिता भिकाने, महावितरणचे अधिकारी आणि प्रादेशिक परिवहन अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना विश्वास पाठक म्हणाले, कंपनीच्या प्रगतीमध्ये वाहनचालकांची महत्त्वाची भूमिका आहे. वाहनचालकांनी अधिकाऱ्यांची मानसिकता ओळखून त्यानुसार काम केल्यास ते अधिक प्रभावीपणे होऊ शकते. वाहनचालकांच्या समस्येचे निराकरण तात्काळ करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
 
 
यावेळी संबोधित करताना सुचिता भिकाने म्हणाल्या, "कार्यशाळा हा एक प्रकारचा स्नेहमेळावाच आहे. दैनंदिन कामकाज करताना वाहनचालकांनी शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळायला हवे. वाहनचालकांच्या काही समस्या असतील तर थेटपणे बोला. त्याचे निराकरण करण्याबाबतची कार्यवाही प्रशासन स्तरावर करण्यात येईल".
 
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.