मुंबई : (CM Yogi Adityanath) उत्तर प्रदेश विधानसभेच्या अधिवेशनात बुधवारी २४ डिसेंबरला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांनी समाजवादी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. अधिवेशनादरम्यान त्यांनी बेकायदेशीर अतिक्रमणांबाबत आपल्या कडक भूमिका स्पष्ट केली. अतिक्रमण आणि कायदा-सुव्यवस्थेच्या मुद्द्यावर भाष्य करताना त्यांनी ठाम शब्दांत सांगितले की, राज्यात बेकायदेशीर अतिक्रमण करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही.(CM Yogi Adityanath)
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी सभागृहात उत्तर प्रदेशमधील सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्था ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचे प्रतिपादन केले. अतिक्रमणाच्या प्रवृत्तीवर हल्ला चढवत त्यांनी म्हटले की, "मी या सभागृहाला आश्वासन देतो की, कोणत्याही स्मारकावर, सरकारी जमिनीवर, सार्वजनिक मालमत्तेवर किंवा ऐतिहासिक स्थळावर अतिक्रमण करणाऱ्या कोणालाही, मग ते कोणीही असो, मी सोडणार नाही. सरकारी जमिनीवर बेकायदेशीर बांधकाम करणाऱ्या किंवा पैसे उकळणाऱ्या माफियांवर बुलडोझर चालवला जाईल, तसे करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही."(CM Yogi Adityanath)
राज्यातील दंगलींविरुद्ध केलेल्या कारवाईबद्दल मुख्यमंत्री योगी (CM Yogi Adityanath) म्हणाले की, "दंगल कशी होते आणि ती कशी हाताळली पाहिजे, याबद्दल बरेलीच्या मौलानांना विचारा. त्यांच्यावर उपचार कसे केले जातात? आता ना कर्फ्यू आहे ना दंगल. आता उत्तर प्रदेशमध्ये सर्व काही ठीक आहे. कारण हे नवीन उत्तर प्रदेश आहे."(CM Yogi Adityanath)
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\