नवनाथ बन यांची काँग्रेसवर टीका तर उबाठा मधील मामू यांच्या प्रवेशावरून खैरे नाराज

    23-Dec-2025
Total Views |
Chandrakant Khaire and Navnath Ban

मुंबई : ( Nawnath Ban Targets Congress Over Vote Bank Politics ) भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी आपल्या एक्स हँडलवरून काँग्रेसवर निशाणा साधला आहे. मंगळवार दि.२३ रोजी आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात ,"४० पैकी १० स्टार प्रचारक एका धर्माचेच काँग्रेसची व्होटबँक नीती उघडी काँग्रेस मुस्लिम लीगच्या वाटेवर ,महाराष्ट्र काँग्रेसचा हिंदूविरोधी अजेंडा सुरू.महाराष्ट्र फाळणीची प्रयोगशाळा नाही. महापालिका निवडणुकीत काँग्रेसला जनता उत्तर देणार.
 
काँग्रेसची खरी ओळख आता लपून राहिलेली नाही. महापालिका निवडणुकीतील ४० स्टार प्रचारकांपैकी १० नावं एका विशिष्ट धर्मातील असणं हा योगायोग नाही, तर उघड उघड धर्माधारित व्होटबँक राजकारणाचा अजेंडा आहे. स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवणारी काँग्रेस आज मुस्लिम लीगच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारण करत आहे. विकास, कामगिरी आणि नेतृत्व शून्य झाल्यावर काँग्रेसला आता हिंदूविरोधी अजेंडा राबवावा लागतोय. पण महाराष्ट्र ही फाळणीची प्रयोगशाळा नाही. महापालिका निवडणुकीत जनता यांना योग्य उत्तर देणारच."
 
हेही वाचा : ठाकरे बंधू एकत्र येण्याचा आमच्यावर परिणाम नाही; मंत्री चंद्रशेखर बावनकुळ
 
दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर येथे उबाठा गटाने काँग्रेसचे स्थानिक नेते आणि माजी महापौर रशीद मामू यांचा उबाठामध्ये प्रवेश केला आहे. यावरून चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यातील मतभेद उघड झाले आहेत. या प्रवेशामुळे चंद्रकांत खैरे नाराज झाले असून ,सोमवार दि.२२ रोजी मनपा निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीवेळी, भर रस्त्यात खैरे यांनी रशीद मामू यांना माझा तुला विरोध आहे. तिकीट देणार नाही असं सांगितलं होतं. ज्या माणसाने मनपात वंदे मातरमसाठी विरोध केला. त्यांना पक्षात घेण्याबाबत कुठलीही कल्पना नव्हती, देशविरोधात वक्तव्य केलं अशा व्यक्तीला घेण्यास नकार दिल्याचं खैरे यांनी सांगितलं होते.
 
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर धार्मिक तेढ निर्माण करून दंगली पेटवण्याची याचिका दाखल झाली होती आणि ज्याने ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे दिले होते. त्यामुळे आपण आपल्या मतांच्या लांगुलचालनासाठी देशविघातक, देशविरोधी शक्तींना ताकद देत आहात, हे सिद्ध होत आहे. मुंबईकर आपल्याला नक्कीच धडा शिकवतील", असा इशारा त्यांनी ठाकरेंना दिला होता.'छत्रपती संभाजीनगरला विरोध करणारा हाच तो मामू ज्याला तुम्ही पक्षात घेतले आहे', असेही अमीत साटम म्हणाले आहेत.