मुंबई : (Malsane Namokar Shrine) नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार राहुल आहेर उपस्थित होते. (Malsane Namokar Shrine)
याठिकाणी ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनाकरिता १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत. या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, कोणत्याही कामात तडजोड करण्यात येऊ नये. ही कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत," असे निर्देश त्यांनी दिले. (Malsane Namokar Shrine)
"णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सोयीसुविधा येथे भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात. देश-विदेशातून येथे भाविक येणार असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला या ठिकाणी येण्याचे समाधान मिळेल, अशा पद्धतीने महोत्सवाचे आयोजन करावे. महोत्सव आयोजनासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी. येथील पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करण्यात यावा," असेही त्यांनी सांगितले. (Malsane Namokar Shrine)
तीर्थाच्या विकासातून होणार रोजगारनिर्मिती
"या तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. त्यादृष्टीने विकास आराखडा राबविण्यात यावा. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून १० ते १५ लाख भाविक येतील. हा सोहळा यशस्वी करावा," असे आवाहनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. (Malsane Namokar Shrine)
णमोकार तीर्थ हे जैन धर्मस्थळ असून नाशिक-धुळे महामार्गावर मौजे मालसाणे गावाजवळ ४० एकरावर स्थित आहे. आराखडा अंतर्गत णमोकार तीर्थ क्राँकिट रस्ता तयार करणे, संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे करण्यात येणार आहे. या ठिकाणी ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ कालावधीत आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी पाण्याच्या टाक्या बसविणे, ४५० युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना करण्यात येणार आहे. (Malsane Namokar Shrine)
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....