ज्येष्ठ संगीतकार स्व वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृतिदिनी संगीतामधून आदरांजली अर्पण ...

    22-Dec-2025
Total Views |
 
Tribute to Late Vasant Desai
 
मुंबई : ( Tribute to Late Vasant Desai ) ज्येष्ठ संगीतकार स्व वसंत देसाई यांच्या ५० व्या स्मृतिदिनी त्यांचे शिष्य ज्येष्ठ संगीतकार श्री सोमनाथ परब सर यांच्या युवा कला मंचच्या माध्यमातून वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेल्या गीतांमधून छत्रपती शिवाजी महाराज उद्यानमधील स्व वसंत देसाई स्मृतीस्तंभाजवळ आदरांजली वाहिली.
 
हेही वाचा : २५ ते ३१ डिसेंबर रोजी एन.डी.स्टूडियो येथे कार्निव्हलचे आयोजन
 
कार्यक्रमाला ज्येष्ठ गायिका प्रमिलाताई दातार उपस्थित होत्या तसेच सध्या लोकांचे मन जिंकणाऱ्या महाराष्ट्राची हास्य जत्रा मधील प्रसिद्ध कीबोर्ड आर्टिस्ट श्री अमित हडकर, क्रीडा क्षेत्रातील समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख पद्मश्री श्री उदय देशपांडे सर, इतिहासकार व छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर सखोल अभ्यास करून आजपर्यंत ३० पुस्तक लिहिणारे उत्तम लेखक, वक्ते आणि विश्लेषक श्री अप्पा परब सर ,राष्ट्र सेविका समितीच्या प्रचारिका कुंदाताई फाटक, सामाजिक कार्यकर्ता व विश्व हिंदू परिषदेचे प्रांत प्रचार प्रसार विभागाचे प्रशांत पळ, भाजपच्या जिल्हा महामंत्री सौ अक्षताताई तेंडुलकर तसेच संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.दादर विभागातील वेगवेगळ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन सामूहिक गीतांमध्ये सहभाग घेतला. आज पर्यंत सोमनाथ परब सरानी संगीत हि विद्या आहे व विद्या हि विकली जत नाही ह्या विचारातून अनेक महिला व पुरुषानं मोफत संगीत शिकवले त्या सर्व विद्यार्थ्यांनी ह्या कार्यक्रमासाठी थक मेहनत घेतली.