दोन भावांचा प्रितीसंगम नाही भीतीसंगम होणार आहे - नवनाथ बन

    22-Dec-2025
Total Views |
Navnath Ban
 
मुंबई : ( Navnath Ban ) " दोन भावांचा प्रितीसंगम नाही तर भीती संगम होणार आहे. ज्या भावाला घरातून बाहेर काढल होते त्या राज ठाकरेंना आता उबाठाची सत्ता जाणार या भीतीपोटी जवळ केलं जात आहे. जनतेने तुम्हाला घरी बसण्याचे आवडते काम दिले आहे."अशी प्रतिक्रिया भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवार दि.२२ रोजी नरिमन पॉईंट, मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 
"गेल्या पाच वर्षांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात मुंबईत ज्या पद्धतीचा विकास झाला आहे. मुंबईत महायुतीच्या माध्यमातून जे काम होत आहे. त्यामुळे उबाठाचा पराभव होणार हे निश्चित झाले आहे.ही भीती असल्यानेच राज ठाकरेंच्या सोबत जाण्याचा प्रयत्न केला जात आहे.हे राज्यातील जनतेला ठाऊक आहे. १६ तारखेला मुंबई महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकणार आहे."असेही बन म्हणाले.
 
"राज ठाकरेंना ६० जागा देऊन त्यांची बोळवण करण्याचा प्रयत्न उबाठा कडून सुरू आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युती होईल का याची खात्री नाही.कारण राज ठाकरे ६० जागांवर समाधानी होणार नाहीत.त्यांच्या युतीचे काहीही झाले तरी राज्यातील नगरपालिकेप्रमाणेच पुढेही जनता महायुतीला साथ देईल." असे मत बन यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर व्यक्त केले.
 
हेही वाचा : Sharif Usman Hadi : बांगलादेशातील हिंसाचार वाढला; शरीफ उस्मान हादींच्या हत्येनंतर विद्यार्थी नेत्यावर गोळीबार
 
"पुरावा न देता फुकटची बडबड करायची राऊत यांची जुनी सवय आहे. उधळपट्टीचे आरोप करायचे पण एक पुरावा देखील द्यायचा नाही.तुमची महावसूली अन् भ्रष्टाचार राज्यातील जनतेला माहीत आहे. बेस्ट च्या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र आले होते. निवडणूक बॅलेट पेपरवर झाली होती. तरीही त्यांचा पराभव झाला. तो ट्रेलर होता आता महापालिका निवडणुकीत धुरंदर देवेंद्र फडणवीसच आहेत हे सिद्ध होईल. छत्रपती संभाजीनगर नामांतरला ज्यांनी विरोध केला होता त्यांना मातोश्रीवर उबाठा गटात प्रवेश दिला जातो. त्यामुळे रेहमान डकेत हे दुर्दैवाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अन् संजय राऊत आहेत." अशी टीका बन यांनी केली.
 
"शरद पवार गटाच्या तीनपट जागा काँग्रेसला मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कुणाची बी टीम आहे याचे उत्तर रोहित पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ, शरद पवार, राहुल गांधी यांना विचारलं पाहिजे.उलट काँग्रेस पास पण झाली नाही कारण त्यासाठी १०० पैकी ३५ मार्क लागतात काँग्रेसला ३० मिळाले आहेत. आमची लढाई काँग्रेससोबत आहे.आणि आमची मुंबईत लढाई उबाठा सोबत आहे."प्रतिक्रिया बन यांनी दिली.