मुंबई : ( Indian Railway ) केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने वाढत्या संचालन खर्चाला सामोरे जात असताना आर्थिक समतोल साधण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी किरकोळ भाडेवाढ जाहीर केली आहे. रेल्वे मंत्रालयाने तिकीट दरवाढीची अधिकृत घोषणा केली असून नवे भाडे दि.२६ डिसेंबर २०२५पासून लागू होणार आहे. वाढत्या ऑपरेशनल खर्चाला सामोरे जात आर्थिक समतोल साधणे आणि भारतीय रेल्वेची आर्थिक शाश्वतता मजबूत करणे, हा या निर्णयामागचा उद्देश आहे. ही दरवाढ मर्यादित असली तरी एकूण तिकीट उत्पन्नावर परिणाम करणारी आहे .ही दरवाढ फक्त मूळ प्रवासी भाड्यावर लागू आहे. आरक्षण शुल्क, सुपरफास्ट सरचार्ज, जीएसटी किंवा इतर कोणत्याही शुल्कात बदल नाही.
रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत माहितीनुसार, वाढत्या क्रियाकलापाच्या आणि मनुष्यबळ खर्चामुळे भाडे दरात सुधारणा करण्यात आली आहे. वर्ष २०२४-२५ या आर्थिक वर्षात रेल्वेचा एकूण ऑपरेशनल खर्च सुमारे २.६३ लाख कोटी इतका झाला असल्याचे मंत्रालयाने नमूद केले आहे. दैनंदिन प्रवासी आणि लोकल सेवांचा वापर करणाऱ्यांवर या दरवाढीचा फारसा परिणाम होणार नाही. १,००० किमीपेक्षा जास्त अंतराच्या प्रवासातही भाडेवाढ मर्यादितच राहणार आहे. ही दरवाढ संतुलन साधणारी आणि रणनीतिक निर्णय असल्याचे रेल्वेचे मत आहे.
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.