Sadhvi Ritambhara : ध्येयपूर्तीसाठी आपल्यातील साधना जागृत करणे गरजेचे : साध्वी ऋतंभरा

    21-Dec-2025   
Total Views |
Sadhvi Ritambhara
 
ठाणे : (Sadhvi Ritambhara) मनुष्यात साधनेची कमतरता नसते, उलट आपल्याला आपले ध्येय स्पष्ट नसते. त्याच ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांना आपल्यातली साधनेला जागृत करायचे आहे, असे प्रतिपादन पद्मभूषण साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) यांनी केले.(Sadhvi Ritambhara)
 
विश्व हिंदू परिषद अंतर्गत बजरंग दल (ठाणे महानगर) च्या वतीने शौर्य दिन व गीता जयंती निमित्त रविवार, दि. २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता रघुवंशी हॉल, ठाणे येथे 'आशीर्वचन' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.(Sadhvi Ritambhara)
याप्रसंगी व्यासपीठावर कुटुंब प्रबोधन कोकण प्रांत सह संयोजक डॉ. विवेकानंद वडके, क्षेत्र मंत्री रामचंद्र रामुका, मुंबई महानगर संघचालक सुरेश भारतीय, विभाग संघचालक चंद्रशेखर सुर्वे, विश्व हिंदू परिषद कोकण प्रांत उपाध्यक्ष प्रिया सावंत, दुर्गा वाहिनी प्रांत संयोजिका स्वाती भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.(Sadhvi Ritambhara)
 
हेही वाचा : Ameet Satam : मुंबईचा रंग बदलू देणार नाही - आमदार अमीत साटम 
 
उपस्थितांना संबोधत साध्वी ऋतंभरा (Sadhvi Ritambhara) पुढे म्हणाल्या, हिंदू संस्कृती अशी आहे जी प्रत्येकात सामर्थ्य ठेवते. समोरील शत्रू कितीही बलवान असला तरी आपल्याला प्रत्येकातील हे सामर्थ्य जागवायचे आहे. रावणाने सीताहरण केल्यानंतर प्रभू श्रीरामांनी इतर राजांकडे मदत मागितली नाही तर, वनवासातील छोट्या छोट्या गटांना बलशाली केले. त्यांच्या सहाय्याने ते सीता मातेपर्यंत पोहोचू शकले. आपण बलवान कसे बनू शकतो? यावर विचार करून त्यावर स्मरण करण्याची आज गरज आहे.(Sadhvi Ritambhara)
 
डॉ. विवेकानंद वडके यावेळी म्हणाले, ३३ वर्षांपूर्वी बाबरी ढाचा उध्वस्त केला. त्याठिकाणी आज भव्य राम मंदिर उभे आहे. शौर्य प्रकट करायचे असेल तर सामर्थ्य असावे लागते. विचारांचे सामर्थ्य, शरीर सामर्थ्य, शस्त्र सज्जता, ज्ञान, ध्येय हे आपल्याकडे असेल तर प्रत्येक बजरंगी समर्थ होईल.(Sadhvi Ritambhara)
 
कार्यक्रमापूर्वी श्रीराम व्यायामशाळा ते रघुवंशी हॉल बजरंग दलाचे शौर्य संचलन संपन्न झाले. १५४ बजरंगी संपूर्ण गणवेशात होते, तर २६७ कार्यकर्ते प्रत्यक्षरित्या संचलनात सहभागी झाले होते. तरुणाईच्या आत्मविश्वासाचे जागरण, विधायक सामर्थ्याचे दर्शन आणि संघटित युवा शक्तीचा विवेकपूर्ण आविष्कार या हेतूने शौर्य संचलन केले जाते.(Sadhvi Ritambhara)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक