मुंबई : (Calligraphy In Modi Script) दक्षिण कोरियामध्ये पार पडलेल्या जागतिक सुलेखन प्रदर्शनामध्ये जगभरातील असंख्य सुलेखनकारांनी आपल्या कामातून सुलेखनाचा नवा आणि वेगळा विचार मांडला आहे. भारतामधून देखील अनेक सुलेखनकारांनी आपल्या कामाची आगळी वेगळी छाप इथे उमटवली. मुंबईच्या डॉ. तेजस लोखंडे यांनी सुद्धा यावेळी आपल्या मोडी लिपीतील सुलेखनातून शिवकालीन पत्राची प्रतिकृती साकारली. दक्षिण कोरिया येथे पार पडलेल्या जागतिक सुलेखन प्रदर्शनामध्ये त्यांच्या या कार्याचा गौरव झाल्यावर डॉ. तेजस लोखंडे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Calligraphy In Modi Script)
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दक्षिण कोरिया येथे आंतरराष्ट्रीय सुलेखन प्रदर्शनाचे (Calligraphy In Modi Script) आयोजन करण्यात आले होते. साधारण महिन्याभर सुरु असलेल्या या प्रदर्शनामध्ये देशोदेशीच्या सुलेखनकारांनी (Calligraphy In Modi Script) आपली भाषा, आपली लिपी याचे जागतिक स्तरावर प्रदर्शन साकारले. भारतामधून अक्षया ठोंबरे, राम कस्तुरे, सुरेश वाघमोरे, मृत्युका बिस्वास, या भारतीयांचा या प्रदर्शनामध्ये सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या प्रदर्शनातील तेजस लोखंडे यांच्या सुलेखनाला सुद्धा गौरवण्यात आले. सदर प्रदर्शनासाठी जून महिन्यामध्ये अर्ज मागवण्यात आले. जगभरातून साधारण २ ते ३ हजार अर्ज या प्रदर्शनासाठी सादर केले गेले. भारतामधून एकूण ७१ अर्ज या प्रदर्शनासाठी सादर करण्यात आले होते. यामध्ये देवनागरी, मोडी, मल्ल्याळम, अरबी लिपींमधील सुलेखनाचा समावेश होता. या प्रदर्शनाचे महत्व म्हणजे प्रसिद्ध मल्याळम सुलेखनकार नारायण भट्टाथिरी यांची जागतिक सुलेखन संघटनेचे मानद अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती, पहिल्यांदाच एका भारतीय व्यक्तीची या पदावर नेमणूक करण्यात आली होती.(Calligraphy In Modi Script)
यावर आपली प्रतिक्रीया व्यक्त करताना, सुलेखनकार डॉ. तेजस लोखंडे म्हणाले की " एके काळी मोडी लिपी आपल्याकडे व्यवहाराची लिपी होती. आपल्याला जर शिवकाळाचा अभ्यास करायाचा असेल तर मोडी लिपीचा अभ्यास करावा लागतो. केवळ भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा मोडीलिपीचे अभ्यासक मोठ्या प्रमाणात आपल्याला बघायाला मिळतात. माझी संस्कृती, माझा भाषा व्यवहार जगासमोर यावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहे"(Calligraphy In Modi Script)
काय आहे मोडी लिपीतील मजकूराचा आशय?
मोडी लिपीत (Calligraphy In Modi Script) लिहीलेल्या पत्राची माहिती देताना सुलेखनकार डॉ. तेजस लोखंडे म्हणाले की जाबिता नावाचा एक पत्राचा प्रकार असतो, ज्यामध्ये आर्थिक तरतुदींविषयी माहिती दिलेली असते. एका मूळ पत्रावरुन हा मजकूर घेतलेला असून, सुलेखनाच्या (Calligraphy In Modi Script) माध्यमातून त्याची पुनर्मांडणी करण्यात आली आहे. सदर पत्रातून आपल्याला,प्रांतातील गड-किल्ले, त्यांचे आर्थीक नियोजन आदी गोष्टींची माहिती मिळते. राज्य कारभाराचे नियोजन कसे असावे याचाच एक नमूना आपल्याला यातून दिसून येतो.(Calligraphy In Modi Script)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.