BJP's victory in Vidarbha : विदर्भात भाजपची सरशी

    21-Dec-2025   
Total Views |
BJP
 
मुंबई : (BJP's victory in Vidarbha) राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली असून महाविकास आघाडी पुन्हा एकदा पिछाडीवर गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील या निवडणूकीत भाजपने विदर्भात (BJP's victory in Vidarbha) आपला दबदबा कायम ठेवल्याचे दिसते.(BJP's victory in Vidarbha)
 
विदर्भातील १०० नगरपरिषद आणि नगरपंचायतींपैकी निम्म्या म्हणजेच तब्बल ५८ जागांवर भाजपने विजय मिळवला आहे.(BJP's victory in Vidarbha) त्यामुळे विदर्भाने (BJP's victory in Vidarbha) या निकालात महत्वाची भूमिका बजावली आहे. तर, शिवसेना ८ आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ७ जागांवर विजय मिळवला. दुसरीकडे, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षानेही विदर्भात चांगले यश मिळवले आहे. काँग्रेसने विदर्भात २३ जागांवर विजय मिळवला असून ४ जागा इतर पक्षांनी जिंकल्या आहेत. परंतू, उबाठा गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विदर्भात सर्वात खराब कामगिरी केल्याचे दिसले. विदर्भात शरद पवार गटाचे अनिल देशमुख यांच्यासारखे मोठे चेहरे असतानाही त्यांना या निवडणूकीत जनतेने साफ नाकारले आहे. विशेषत: गेल्या काही वर्षांत अनिल देशमुख फारसे राजकारणात सक्रीय दिसत नसल्याने विदर्भात शरद पवार गटाचा सुपडासाफ होण्याच्या मार्गावर आहे.(BJP's victory in Vidarbha)
 
नागपूर जिल्ह्यात भाजपने एकहाती गड राखला
 
विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मभूमी असलेल्या नागपूर जिल्ह्यात भाजपने एकहाती गड राखला आहे. काटोल, मोहपा आणि बुटीबोरी वगळता इतर सर्व नगरपरिषदांमध्ये महायुतीचे मुख्यत्वे भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रचाराचा तडाखा, स्थानिक पातळीवरील संघटनात्मक ताकद आणि विकासाच्या मुद्द्यांवर मिळालेल्या जनसमर्थनामुळेच भाजपने नागपूरात एकहाती वर्चस्व राखले आहे.(BJP's victory in Vidarbha)
 
हेही वाचा : BJP's Victory in Konkan : कोकणात भाजपला मोठे यश ,शत प्रतिशतच्या दिशेने वाटचाल
 
याव्यतिरिक्त अमरावती, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या काही प्रमुख जिल्ह्यांमध्येही महायुतीने यश मिळवले आहे. विदर्भातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक निकालांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाचा संकेत दिला आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण आणि नागरी सुविधा हे मुद्दे या निवडणुकांत निर्णायक ठरले. केवळ भावनिक किंवा राजकीय घोषणांपेक्षा दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रश्नांवर मतदारांनी निर्णय दिला. विदर्भात काँग्रेसची कामगिरी मिश्र स्वरूपाची राहिली. काही पारंपरिक बालेकिल्ल्यांत पक्ष टिकून राहिला असला, तरी नव्या शहरी भागांत अपेक्षित वाढ दिसून आली नाही. स्थानिक नेतृत्वाचा अभाव, अंतर्गत गटबाजी, मुद्देसूद प्रचाराचा अभाव आणि नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्यात अपयशाचा हा परिणाम असल्याचे बोलले जाते. एकूणच विदर्भात भाजप आघाडीवर असून, काही भागात काँग्रेसने यश मिळवले. तर काही ठिकाणी अपक्ष किंवा स्थानिक उमेदवारांचा दबदबा कायम राहिला.(BJP's victory in Vidarbha)
 
भाजप विदर्भातील सर्वात प्रभावी पक्ष
 
विदर्भातील (BJP's victory in Vidarbha) नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणाला नव्याने दिशा दिली आहे. या निवडणुका जरी स्थानिक प्रश्नांभोवती फिरत असल्या, तरी त्यातून राज्यातील एकंदरित राजकीय प्रवाह, पक्षांची संघटन क्षमता आणि मतदारांची मानसिकता स्पष्टपणे समोर आली आहे. आकडेवारीकडे पाहता, विदर्भातील निकाल हे अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरतात. या निवडणुकांमध्ये भाजप हा विदर्भातील (BJP's victory in Vidarbha)  सर्वात प्रभावी पक्ष म्हणून पुढे आला. अनेक नगरपरिषदांमध्ये थेट सत्ता, तर काही ठिकाणी सर्वाधिक जागा मिळवून भाजपने (BJP's victory in Vidarbha) नेतृत्वाची भूमिका बजावली.(BJP's victory in Vidarbha)
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....