BJP's Victory in Konkan : कोकणात भाजपला मोठे यश ,शत प्रतिशतच्या दिशेने वाटचाल

    21-Dec-2025
Total Views |
BJP
 
मुंबई : (BJP's Victory in Konkan) रविवार दि.२१ रोजी नगरपालिका आणि नगरपरिषदेचा निकाल लागलेला आहे. त्यात कोकणात भाजपाने (BJP's Victory in Konkan) मोठे यश संपादन केले आहे.कोकणातील (BJP's Victory in Konkan) नगराध्यक्ष पदाच्या एकूण २७ जागांपैकी भाजपाचे ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी काँग्रेस १, उबाठा २ ,शरद पवार गट १,आणि इतर ४ असे उमेदवार विजयी झाले आहेत. कोकणात काँग्रेसला बहुतांश ठिकाणी खातेसुद्धा खोलता आले नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंत्री नितेश राणे यांच्या साथीने कोकणावर विशेष लक्ष दिले होते. त्यांनी संपर्क दौरे सुद्धा केले होते. त्याचे फळ त्यांना मिळाले आहे.(BJP's Victory in Konkan)
 
सावंतवाडी नगरपरिषदेत भाजपाने ११ ठिकाणी विजय मिळवला असून नगराध्यक्षाच्या निवडणुकीत भाजपाच्या श्रद्धा राजे भोसले विजयी झाल्या आहेत.वेंगुर्ले नगरपरिषदेत भाजपाचे १६ उमेदवार विजयी झाले असून नगराध्यक्षपदी भाजपाचे राजन गिरफ विजयी झाले आहेत. कणकवली नगरपरिषदेत भाजपाचे ९ उमेदवार विजयी झाले आहेत. मालवण नगरपरिषदेत भाजपाला ५ जागांवर विजय प्राप्त झाला आहे. चिपळूण नगरपरिषदेत भाजपाला ११ पैकी ९ ठिकाणी विजय प्राप्त झाला आहे.गुहागर आणि देवरुख मध्ये नगराध्यक्ष पदासह ८ उमेदवार विजयी झाले आहेत.रत्नागिरीत भाजपाने ६ पैकी ६ जागा जिंकत १००% स्ट्राईक रेट राखला आहे.(BJP's Victory in Konkan)
 
नगराध्यक्ष पद देखील महायुतीला मिळाले आहे. लांजा मध्ये भाजपाचा एक नगरसेवक निवडून आला असून पालघरमधील जव्हार नगरपरिषदेवर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार पूजा उदावंत विजयी झाल्या तर २० पैकी १४ जागांवर भाजपने कमळ फुलवले आहे. राजापूरमध्ये भाजपाचे २ नगरसेवक विजयी झाले आहेत.(BJP's Victory in Konkan)
 
खेड नगरपरिषदेत महायुतीचा नगराध्यक्ष निवडून आला असून भाजपाने ३ ठिकाणी विजय मिळवला आहे.रत्नागिरीसह सिंधुदुर्गमध्येही महाविकास आघाडीला सपशेल अपयश आलेले आहे.(BJP's Victory in Konkan)
" मला ही संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री नितेश राणे आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार.आणि जनतेचा आशीर्वाद मिळाला त्याबद्दल समाधानी आहे." अशी प्रतिक्रिया सावंतवाडीच्या नूतन नगराध्यक्ष श्रद्धा राजे भोसले यांनी दिली.(BJP's Victory in Konkan)
 
"रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश नगरपालिका निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व यश मिळवले असून ३९ पैकी ३६ जागांवर विजय मिळवला आहे.पक्ष शत प्रतिशतच्या दिशेने नक्की जाईल.२०२९ ल चित्र यापेक्षा वेगळे असेल.येणाऱ्या काळात पक्षाचे नगरसेवक उत्तम काम करतील. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनात आमचे नगरसेवक ताकदीने काम करतील." अशी प्रतिक्रिया रत्नागिरी येथील भाजपा नेते अनिकेत पटवर्धन यांनी दिली.(BJP's Victory in Konkan)