अंबरनाथ नगराध्यक्षपदी भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील विजयी, बदलापूर नगराध्यक्षपदी भाजपच्या रुचिता घोरपडे विजयी
21-Dec-2025
Total Views |
ठाणे : ( Ambernath and Badlapur: BJP Wins ) अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेमध्ये शिवसेना (शिंदे गट ) पक्षाचा कित्येक वर्ष नगराध्यक्ष निवडणून येत होता, यामुळे हा परिसर शिवसेनेचा गड म्हणून ओळखला जात होता, या परिसरात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत केलेल्या कामामुळे अंबरनाथ नगराध्यक्ष पदावर भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील आणि बदलापूर नगराध्यक्ष पदावर रुचिता घोरपडे या विजयी झाल्या आहेत. यामुळे कित्येक वर्षांपासून शिवसेनेकडे असलेला अंबरनाथ, बदलापूर गड कोसळला आहे.
अंबरनाथ येथे नगराध्यक्ष पदाच्या निवणुकीच्या रिंगणात भाजपच्या उमेदवार तेजश्री करंजुले पाटील विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांच्यामध्ये मोठी चुरस होती, पण अखेर भाजपच्या तेजश्री करंजुले पाटील याना ५४ हजार ८६ मते मिळून विजय झाला. याच बरोबर सदस्य पदाच्या निवडणुकीत ५९ सदस्य पैकी भाजप- १४, शिवसेना (शिंदे गट)- २७, काँग्रेस- १२, राष्ट्रवादी काँग्रेस- ४ आणि अपक्ष- २ सदस्य निवडून आले.
तसेच बदलापूर येथे नगराध्यक्ष पदाकरिता भाजपच्या रुचिता घोरपडे विरुद्ध शिवसेना शिंदे गटाच्या विना म्हात्रे यांच्यात खरी लढत सुरु होती, यामध्ये भाजपच्या रुचिता घोरपडे याना ५६ हजार ९७० मते मिळून विजय झाला. तर सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजप -२३, शिवसेना (शिंदे गट) -२३, काँग्रेस -३ जागांवर निवडून आले आहेत. अंबरनाथ आणि बदलापूर या ठिकाणी भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दोन सभा झाल्या होत्या, या सभांमध्ये विकासाला मत द्या असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले होते, याचाच परिणाम होऊन नागरिकांनी विकासाला मते देऊन या दोन्ही नगरपरिषदेमध्ये भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत.