Piyush Goyal : प्रशासनिक सुधारणा, उद्योगप्रधान वाढ आणि नवोन्मेष यांच्या जोरावर भारत दोन वर्षांत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल! : पीयुष गोयल
मुंबई : (Piyush Goyal) प्रशासनिक सुधारणा, उद्योगप्रधान वाढ आणि नवोन्मेष यांच्या जोरावर भारत २०२७ पर्यंत (दोन वर्षांत) जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आणि २०४७ पर्यंत ३० ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सहून अधिक मूल्याची अर्थव्यवस्था होण्याच्या दिशेने ठामपणे वाटचाल करत आहे", असे प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी केले.
ग्रॅण्ड हयात, सांताक्रूझ येथे संपन्न झालेल्या विश्व हिंदू इकोनॉमिक फोरमच्या दोन दिवसीय (१९-२० डिसेंबर) वार्षिक परिषदेत त्यांनी ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर उपस्थितांना संबोधित केले.(Piyush Goyal)
ते म्हणाले,(Piyush Goyal) भारताची विकासयात्रा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या त्याच्या सांस्कृतिक मूल्यांवर आधारित आहे.ही विचारधारा स्वामी विवेकानंदांनी शंभर वर्षांहून अधिक काळापूर्वी मांडली होती आणि २०२३ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताच्या जी- २० अध्यक्षतेदरम्यान जागतिक स्तरावर अधिक दृढ झाली. ही तत्वज्ञानात्मक दृष्टी जागतिक प्रशासनासाठी शाश्वत मॉडेल प्रदान करते.(Piyush Goyal)
भारताच्या आर्थिक प्रवासाचा आढावा घेताना पीयुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले, स्वातंत्र्यानंतर देशाने मर्यादित वाढ, अस्थिरतेचे टप्पे अनुभवले, त्यानंतरच अर्थपूर्ण सुधारणांचा काळ सुरू झाला. मागील दशकात निर्णायक बदल घडून आला असून सातत्यपूर्ण सुधारणा, राजकीय स्थैर्य आणि पारदर्शक प्रशासनामुळे भारत जागतिक स्तरावर आदर्श ठरलाय.(Piyush Goyal)
सध्याच्या सरकारअंतर्गत भारताच्या विकास धोरणाचे तीन मुख्य स्तंभ स्पष्ट केले; सार्वजनिक कल्याण, पायाभूत सुविधा, नवोन्मेष आणि उद्यमशीलता. गृहनिर्माण, स्वच्छता, अन्नसुरक्षा, वीज, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, शिक्षण आणि डिजिटल कनेक्टिव्हिटी यांसारख्या मोठ्या प्रमाणावरील उपक्रमांमुळे नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या आहेत, यामुळे विशेषतः युवकांना मोठी स्वप्ने पाहण्याची आणि आर्थिक वाढीत आत्मविश्वासाने सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. महामार्ग, द्रुतगती मार्ग, विमानतळ, रेल्वे, बंदरे आणि डिजिटल नेटवर्क्स यांचा झपाट्याने विस्तार झाला आहे. भारतीय रेल्वेचे ९९ टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून यामुळे कार्यक्षमता, सुरक्षितता आणि शाश्वतता वाढली आहे. या सुधारणांमुळे उद्योजकता आणि रोजगारनिर्मितीला चालना मिळाली असून भारत एक जबाबदार जागतिक विकास भागीदार म्हणून पुढे येत आहे.(Piyush Goyal)
भारताची खरी ताकद त्याची संस्कृती, एकता आणि सामूहिक कर्तव्यभावना यात आहे. इतिहासातून शिकत, एकजूट राखत आणि एकत्र काम करत भारत ‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय साध्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. पूर्ण विकसित राष्ट्र होईपर्यंत भारताची वाढ, सुधारणा आणि नेतृत्व अखंडपणे सुरू राहील, असे पीयुष गोयल (Piyush Goyal) म्हणाले.
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक