Subhash Bhoir : शिवसेना उभाठा पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर शेकडो पदाधिकाऱ्यांसह भाजपात

उबाठाला ठाणे-कल्याणमध्ये दणका! माजी आमदार सुभाष भोईर यांच्यासह शेकडो पदाधिकारी भाजपात

    20-Dec-2025
Total Views |
Subhash Bhoir
 
ठाणे : (Subhash Bhoir) भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी आपल्या ठाणे शहर, कल्याण ग्रामीण भागातील ३२ पदाधिकाऱ्यांसह मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालय येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला. यावेळी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर अध्यक्ष संदीप लेले, प्रवक्ते नवनाथ बन उपस्थित होते.(Subhash Bhoir)
 
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघातील माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) हे ठाणे महानगपालिकेचे पाच वेळा नगरसेवक होते,चार वेळा विरोधी पक्ष नेते होते, सिडकोचे संचालक, विधानपरिषदेचे आमदार होते तसेच २०१४ साली कल्याण ग्रामीण भागातून आमदार झाले, शिवसेना संपर्कप्रमुख त्यांनी काम केले, कल्याण लोकसंपर्क प्रमुख म्ह्णून देखील त्यांनी कार्य केले आहे.(Subhash Bhoir)
 
या प्रसंगी माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी सांगितले कि, माझी खरी सुरुवात भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून १९८४ पासून सुरुवात झाली, १९८६ ला मी ठाणे महानगरपालिकेची निवडणूक झाली, यामध्ये पहिले पाच नगरसेवक भाजपचे निवडून आले, त्यामधील मी एक नगरसेवक देखील भाजपचा होतो, माझी सुरुवात चांगली झाली आणि शेवट देखील माझा चांगला होईल यामुळे भाजप पक्षामध्ये भारताचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव भारतभर विकासपुरुष म्हणून घेतले जाते, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण हे धडाडीचे, ताकदवान असे नेते आहेत, सर्वाना सोबत घेऊन जाणारे, सर्वाना नेतृत्व देणारे, सर्वाना तळागाळात जाऊन काम करणारे असे प्रदेश अध्यक्ष आहेत. समाजामध्ये काम करताना आम्ही देवा भाऊंच्या आदेशानुसार आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून काम करणार आहोत, असे माजी आमदार सुभाष भोईर (Subhash Bhoir) यांनी सांगितले.(Subhash Bhoir)
 
हेही वाचा : Ravindra Chavan : शेठ, नेता नाही तर पारदर्शीपणे काम करणारी व्यक्ती महापौरपदी हवी- रवींद्र चव्हाण 
 
या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी सांगितले कि, आज या ठिकाणी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आमचा जुन्या सहकार्याचा प्रवेश झाला आहे, त्यांचे अभिनंदन करतो, त्यांना भारतीय जनता पार्टी माहिती आहे, भाजपची भूमिका आणि पंच तत्व माहिती आहे असे सुभाष भोईर (Subhash Bhoir) आहेत, यामुळे ठाणे जिल्ह्याच्या वातावरणात त्यांची भर पडली आहे, यामुळे जनाधार असलेले व्यक्ती कि, ज्याने दोन वेळा आमदार म्हणून काम केले आहे, महानगपालिकेत पाच वर्ष त्यांनी काम केले आहे असे सुभाष भोईर आहेत, ते भाजप पक्षात आलेत त्यांच्या सोबत तसेच कल्याण ग्रामिन भागातील उभाटा पक्षातील पदाधिकारी आले, त्यांचे स्वागत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये विकासाचा अजेंडा सुरु केला आहे, तो विकासाचा अजेंडा आपण महापालिका निवडणुकीत देखील पुढे नेऊ, यामुळे ठाणे शहराला बळकटी येईल असे आमदार केळकर यांनी सांगितले.(Subhash Bhoir)
 
प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले कि, ठाणे जिल्ह्यामध्ये एक सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे आणि वर्षानुवर्षे ठाणे जिल्ह्यातील समस्या सोडवण्याचे काम करणारे आमचे ज्येष्ठ सुभाष भोईर आणि त्यांच्या सोबत आलेले सर्व उभाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्यांचे अभिनंदन करतो, मुंख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वरिष्ठ पातळीवर ज्यांचे असलेले संबंध, एक फोन करून सुभाष भोईर यांनी आज पक्ष प्रवेश केला आहे, यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने देखील त्यांचे आभार मानतो. (Subhash Bhoir)
 
ठाणे जिल्ह्यातील कल्याण ग्रामीण आणि ठाणे शहर परिसरातील पदाधिकारी यांनी पक्ष प्रवेश केला, यामध्ये सुमित सुभाष भोईर,(Subhash Bhoir) शिवसेना उभाटा पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रमेश पाटील, उपतालुका प्रमुख सुखदेव पाटील, सूरज जाधव कल्याण विधानसभा युवा अधिकारी, अभिषेक ठाकूर, प्रसाद पाटील, विश्वनाथ पाटील, उमेश राठोड यांच्यासमवेत ३२ पदाधिकरी आणि शेकडो कार्यकर्ते यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला.(Subhash Bhoir)