Osman Hadi : 'उस्मान हादी'च्या मृत्यूनंतर बांगलादेशात उसळले हिंसक आंदोलन

    20-Dec-2025   
Total Views |
Osman Hadi
 
मुंबई : (Osman Hadi) बांगलादेशात पुन्हा एकदा हिंसाचाराची लाट उसळल्याचे पहायला मिळत आहे. ढाकामध्ये शरीफ उस्मान हादी (Osman Hadi) यांच्या मृत्यूनंतर हिंसक आंदोलन अद्यापही सुरूच आहेत. उस्मान हादी (Osman Hadi) याच्या समर्थकांनी माध्यम संस्थांवर, शेख हसीना यांच्या पक्ष अवामी लीगवर आणि भारतीय उच्चायोगावर हल्ले केले. ठिकठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली.(Osman Hadi)
 
मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार, दि. १२ डिसेंबर रोजी उस्मान हादी (Osman Hadi) याच्यावर गोळीबार झाला होता, त्यानंतर ते सिंगापूरमधील रुग्णालयात उपचार घेत होते. सिंगापूरच्या परराष्ट्र मंत्रालयाने १८ डिसेंबर रोजी निवेदन जारी करत सांगितले की, डॉक्टरांच्या सर्व प्रयत्नांनंतरही, जखमांमुळे हादी यांचे निधन झाले.(Osman Hadi)
 
ही घोषणा होताच संतप्त उस्मान हादीचे (Osman Hadi) समर्थक रस्त्यावर उतरले आणि हादी (Osman Hadi) यांच्या हत्येस जबाबदार असलेल्यांना अटक करण्याची मागणी करू लागले. मोठ्या प्रमाणावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. आंदोलनाला हिंसक वळण लागले आणि भारतविरोधी घोषणाही दिल्या जाऊ लागल्या.(Osman Hadi)
 
कोण होता उस्मान हादी?
 
बांगलादेशातील झालकाठी जिल्ह्यातील एका मुस्लिम कुटुंबात उस्मान हादी (Osman Hadi) याचा जन्म झाला. त्याचे वडील मदरशामध्ये शिक्षक होते. उस्मान हादीनेही (Osman Hadi) नेराबाद कामिल मदरशातून प्राथमिक शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर ढाका विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचा तो विद्यार्थी होता. अवघ्या सुमारे 32 व्या वर्षी ‘इंकलाब मंच’ या इस्लामी संघटनेचे प्रवक्ता बनला, जी कट्टरपंथी विचारसरणीचा प्रचार करते.(Osman Hadi)
 
हेही वाचा : Thackeray brothers : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा रखडली! राज ठाकरेंची ठाम भूमिका म्हणाले, जागावाटपावर स्पष्टता...
 
शेख हसीना यांच्या सत्तापालटात उस्मान हादीची भूमिका काय?
 
उस्मान हादी (Osman Hadi) बांगलादेशात २०२४ मध्ये उभ्या राहिलेल्या विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा बनला होता. या आंदोलनामुळे शेख हसीना यांच्या सरकारचा सत्तापालट झाला आणि त्यांना देश सोडावा लागला. शेख हसीना यांच्या ‘अवामी लीग’ला संपवण्यात उस्मान हादीची इंकलाब मंच ही संघटना आघाडीवर होती.
 
आगामी निवडणुकीतील उमेदवार
 
अशी माहिती आहे की, उस्मान हादी (Osman Hadi) हे फेब्रुवारी २०२६ मध्ये होणाऱ्या निवडणुका लढवण्याच्या तयारीत होते. ते ढाका-८ मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून प्रचार करत होते. उस्मान हादी याने भारताविरोधात अनेक भडकाऊ विधाने केली होती. अवामी लीगवर भारताच्या प्रभावाखाली असल्याचा आरोप करत तो तीव्र टीका करत असत. भारताशी असलेल्या संबंधांवरून तो वारंवार अवामी लीगला लक्ष्य करत होता. काही ठिकाणी त्याने बीएनपी आणि युनूस यांच्या अंतरिम सरकारवरही भारताच्या प्रभावापासून मुक्त होण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला होता.(Osman Hadi)
 
हादीच्या (Osman Hadi) मृत्यूनंतर त्याच्या समर्थकांकडूनही भारतविरोधी घोषणा दिल्या जात आहेत. समर्थकांचा आरोप आहे की हादीच्या मृत्यूस भारत कारणीभूत आहे आणि हल्लेखोर भारतात पळून गेले आहेत. संतप्त जमावाने बांगलादेशातील भारतीय उच्चायोगाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी वेळीच परिस्थिती हाताळली. त्यानंतर जमाव भारताच्या उप उच्चायुक्तांच्या घराबाहेर जमा झाला, तो हटवण्यासाठी पोलिसांना अश्रुधूराचा वापर करावा लागला.(Osman Hadi)
 
 

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक