Thane Municipal Corporation elections : ठाणे महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीची महत्वाची बैठक संपन्न
20-Dec-2025
Total Views |
ठाणे : (Thane Municipal Corporation elections) ठाण्यात वर्तक नगर येथील भाजप कार्यालयात आगामी ठाणे महानगरपालिका निवडणुकांच्या (Thane Municipal Corporation elections) पार्श्वभूमीवर महायुतीची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवारी पार पडली.(Thane Municipal Corporation elections)
या प्रसंगी भाजपकडून ठाणे शहर आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप प्रदेश सरचिटणीस अॅड. माधवीताई नाईक, ठाणे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघ जिल्हाध्यक्ष संजय वाघुले तसेच शिवसेनेतर्फे ठाणे खासदार नरेश म्हस्के, शिवसेना उपनेते रवींद्र फाटक, शिवसेना ठाणे जिल्हा महिला संघटिका मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक हनुमान जगदाळे, युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्यासह महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.(Thane Municipal Corporation elections)
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली महायुतीची एकजूट, शिस्त आणि समन्वय कायम ठेवत विजय व जनहित या दोनच मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून निवडणूक लढवण्याचा ठाम निर्धार यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आला असल्याचे महायुतीचा वतीने सांगण्यात आले.(Thane Municipal Corporation elections)