Local Body Elections : सर्व नगरपरिषद-नगरपालिका निवडणूकांचे निकाल लांबणीवर

उच्च न्यायालयाचा निर्णय; २१ तारखेला होणार मतमोजणी

    02-Dec-2025   
Total Views |
Local Body Elections
 
मुंबई : (Local Body Elections) राज्यातील नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूकांमध्ये (Local Body Elections) येणारे अडथळे काही केल्या थांबताना दिसत नाही. आता सर्व नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणूकांचा (Local Body Elections) निकाल लांबणीवर पडला असून येत्या २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले आहेत.(Local Body Elections)
 
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा (Local Body Elections) कार्यक्रम जाहीर केला होता. यानुसार, २ डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणूकांचे निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार होते. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा कोर्टात अपील प्रलंबित असलेल्या ठिकाणी निवडणुका २० डिसेंबरपर्यंत पुढे ढकलल्या आहेत.(Local Body Elections)
 
हेही वाचा : Clean Godavari Bond : कुंभमेळ्याचे पावित्र्य राखत विकासासोबत वारशाचे जतन करणार  
 
त्यामुळे काही नगरपरिषदा आणि नगरपालिकांची न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने राज्यातील सर्व नगरपालिका, नगर परिषद निवडणुकांचे निकाल एकाच दिवशी जाहीर व्हावेत. अन्यथा पुढच्या निकालावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा युक्तीवाद न्यायालयात दाखल याचिकांमध्ये करण्यात आला. त्यामुळे राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकींचा निकाल (Local Body Elections) एकाच दिवशी म्हणजे २१ डिसेंबरला जाहीर करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत.(Local Body Elections)
 
२० डिसेंबरपर्यंत आचारसंहिता लागू
 
तसेच या निवडणुकीचे एक्झिट पोलही २० तारखेला निवडणूक संपल्यानंतर अर्ध्या तासाने जाहीर करता येतील असे न्यायालयाने स्पष्ट केले. यासोबतच नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची आदर्श आचारसंहिता २० डिसेंबरपर्यंत लागू राहील, असे न्यायालयाने सांगितले. तसेच औरंगाबाद खंडपीठानेही याविषयी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले आहेत.(Local Body Elections)
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....