मुंबई : (CM Devendra Fadnavis) निवडणूकांसाठी जे उमेदवार मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांची काहीही चूक नसताना यंत्रणेच्या चुकीमुळे अशा गोष्टी होणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणूकांचा निकाल ३ डिसेंबरऐवजी २१ डिसेंबर रोजी जाहीर करण्याचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.(CM Devendra Fadnavis)
यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले की, "खंडपीठाने दिलेला निर्णय सर्वांना मान्यच करावा लागेल. परंतू, जवळपास २५-३० वर्षांहून जास्त काळ मी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पाहतो आहे. घोषित केलेल्या निवडणूका आणि त्यांचे निकाल पुढे जाणे हे पहिल्यांदाच घडले आहे. ही सगळी पद्धती फार योग्य वाटत नाही. खंडपीठ स्वायत्त असल्याने त्यांनी दिलेला निकाल सगळ्यांना मान्य करावा लागेल. निवडणूक आयोगही स्वायत्त आहे. पण यातून जे उमेदवार मेहनत करतात, इतके दिवस प्रचार करतात त्या सगळ्यांचा भ्रमनिरास होतो. त्यांची काहीही चूक नसताना यंत्रणेच्या चुकीमुळे अशा गोष्टी होणे योग्य नाही. निवडणूक आयोगाला अजून खूप निवडणूका घ्यायच्या आहेत. या सगळ्या प्रक्रियेत सुधार आणून किमान पुढच्या निवडणूकांमध्ये असे होणार नाही, हे निवडणूक आयोगाने बघितले पाहिजे."(CM Devendra Fadnavis)
कायद्याचा चुकीचा अर्थ लावला
"कायद्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचा वकील कोण आहे ते मला माहिती नाही. परंतू, कायद्याचा अतिशय चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. आम्हीसुद्धा अनेक वर्षांपासून निवडणूका लढवत असून त्याचे नियम बघितले आहेत. मीसुद्धा अनेक वकिलांशी सल्लामसलत केली आहे. हे चुकीचे आहे, असे माझे मत आहे. ज्याठिकाणी सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पडत आहेत, अशा ठिकाणी कुणीतरी न्यायालयात गेले आणि न्यायालयाने त्याला दिलासा दिला नाही, तरीही तो केवळ न्यायालयात गेला म्हणून तिथल्या निवडणूका पुढे ढकलणे हे कुठल्याच तत्वात बसत नाही. हे अतिशय चुकीचे घडलेले आहे. माझी निवडणूक आयोगावर नाराजी नसून ही प्रक्रिया कायदेशीररित्या होत नसल्यावर आहे. २८४ पैकी केवळ २४ ठिकाणी व्हायच्या आहे म्हणून सगळी मतमोजणी पुढे ढकलणे योग्य वाटत नाही,” असे ते म्हणाले.(CM Devendra Fadnavis)
शिवसेनेचे आ. संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात मतदानाच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यावर बोलताना ते म्हणाले की, “किमान लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड ठेवली पाहिजे. निवडणूकीमध्ये आपण कसे वागतो, काय संकेत देतो याचा विचार लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे,” असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी (CM Devendra Fadnavis) दिला.
कोकणात भाजप आणि शिवसेनेत सुरु असलेल्या वादावर बोलताना ते म्हणाले की, “सगळेच एकमेकांवर आरोप करतात. यासंदर्भात निवडणूक आयोग आणि पोलिस सतर्क आहेत. कुठे गडबड झाल्यास त्याठिकाणी कायदेशीर कारवाई सुरु आहे. एकंदरित या निवडणूका शांतपणे पार पडल्या आहेत. काही ठिकाणी तणाव आहे तर काही ठिकाणी अतिशय टोकाचे मतभेद झाले आहेत. पण ते होणे योग्य नाही, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) म्हणाले.
विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....