HIV/AIDS Awareness Rally : कल्याण शहरात रॅलीद्वारा एच आय व्ही एड्स बाबत जनजागृती

    02-Dec-2025   
Total Views |
HIV/AIDS Awareness Rally
 
कल्याण : (HIV/AIDS Awareness Rally) कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वैद्यकीय आरोग्य विभागामार्फत जागतिक एड्स दिनानिमित्त सोमवारी जनजागृती रॅली  (HIV/AIDS Awareness Rally) काढण्यात आली होती.
 
या घातक रोगाला नियंत्रणात आणण्यासाठी, अडथळ्यांवर मात करू, एकजुटीने एचआयव्ही एड्सला लढा देऊ ,नवपरिवर्तन घडवू ही तीन उद्धिष्ट समोर ठेवून, कृष्णा कुमावत यांच्या नेतृत्वाखाली आयसीटीसी रुक्मिणीबाई रुग्णालय, कल्याण आणि अचिव्हर्स कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने एचआयव्ही, एड्स जनजागृती रॅलीचे (HIV/AIDS Awareness Rally) आयोजन करण्यात आले होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड तसेच उपायुक्त प्रसाद बोरकर यांनी या एड्स रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रॅलीचे उद्घाटन केले. (HIV/AIDS Awareness Rally)
 
या उद्घाटन प्रसंगी प्रशासकीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रज्ञा टिके , रुक्मिणीबाई रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पुरुषोत्तम टिके, एड्स विभागाच्या प्रमुख डॉ. सुलक्षणा त्रिभुवन, वसंत व्हॅली प्रसूतीगृहाच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सपना रामोळे, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. पौर्णिमा ढाके, डॉ.महेश भिवंडीकर (अचिव्हर्स कॉलेजचे प्राचार्य) एआरटी विभागाचे प्रमुख डॉ.राजू लवंगारे व डॉ. अशोक भिडे उपस्थित होते. (HIV/AIDS Awareness Rally)
 
कृष्णा कुमावत यांनी जागतिक एड्स दिनाबाबत प्रस्तावना केली व सर्वांनी एड्सविषयी शपथ घेतली.
 
महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांनी या प्रसंगी उपस्थिताना मार्गदर्शन करताना संसर्गातून कसे वाचवता येईल यासाठी एचआयव्ही/एड्स या आजारा संबंधी जनजागृती फार गरजेची आहे असे सांगितले. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रज्ञा टिके यांनी एच आय व्ही एड्स प्रतिबंधात्मक आणि उपचाराबाबत माहिती दिली त्याचप्रमाणे एआरटी विभाग प्रमुख यांनी एचआयव्ही तपासणीसाठी सर्वांनी आयसीटीसी विभागाशी संपर्क करावा असे आवाहन केले. डॉ. भिवंडीकर यांनी विद्यार्थ्यांना एचआयव्ही एड्स याविषयी माहिती दिली. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी एड्स व मादक द्रव्य या विषयावर पथनाट्य सादर केले. (HIV/AIDS Awareness Rally)
 
हेही वाचा : Illegal Church Construction : आदिवासींच्या जमिनीवर बेकायदेशीर चर्च उभारल्याने स्थानिकांचा संताप  
सदर रॅली बाई रुक्मिणीबाई रुग्णालय येथून सुरू होऊन पुष्पराज हॉटेल - छत्रपती शिवाजी महाराज चौक - सहजानंद चौक - संतोषी माता मंदिर रोड मार्गे अचिव्हर्स कॉलेज येथे सांगता झाली. रॅलीमध्ये संयम पाळा, एड्स टाळा ,श्री शक्तीचा एकच नारा -एचआयव्ही एड्स ला हद्दपार करा अशा घोषणा देण्यात आल्या. (HIV/AIDS Awareness Rally)
या रॅलीत जवळपास 300 एनएसएस रेड रिबन क्लबचे युवक युवती तसेच इतर स्टाफ मिळून ३५० व्यक्तींनी सहभाग नोंदविला. रेल्वे विभागातील कॉर्डिनेटर चंद्रकांत देवरे, रुक्मिणीबाई रुग्णालयातील आयसीटीसीच्या सीमा शेजवळ, शैला गायकवाड, शुभांगी ठमके व एआरटी चे विजय घरटे, कविता माळी, अर्चना सोनवणे, शुभांगी प्रभुदेसाई, सीमा आठवले परिघा विधाते व इतर कर्मचारी हजर होते. (HIV/AIDS Awareness Rally)
 
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील बिर्ला कॉलेज, एमके कॉलेजच्या श्रुती पाटील, सोनवणे कॉलेजचे दिलीप सिंग आणि अतुल पांडे , मुथा कॉलेजच्या वेदांतीनी कुलकर्णी व वैशाली घोरपडे , मॉडर्न कॉलेजचे रवी शेंडगे, व प्रगती कॉलेज चे प्राध्यापक तसेच एनएसएसचे युवक युवतींनी आपला सहभाग नोंदविला. सदर रॅलीसाठी इतर संस्थांनीही सहभाग नोंदविला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णा कुमावत व प्राध्यापक राजेश यादव यांनी केले व शेवटी उपस्थितांचे आभार व्यक्त करून, राष्ट्रगीत गायना नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. (HIV/AIDS Awareness Rally)