मुंबई : (Vijay Sharma) छत्तीसगडमध्ये गेल्या काही वर्षांत नक्षली आत्मसमर्पणाची प्रक्रिया मोठ्या वेगाने वाढली आहे, आणि राज्य व केंद्र सरकार दोन्ही याला मोठे यश मानत आहेत. छत्तीसगडमधील ८०% माओवाद पूर्णपणे समाप्त झाल्याचे मोठे विधान छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा (Vijay Sharma) यांनी नुकतेच केले. हा प्रभाव काही मर्यादित भागापुरताच उरला असल्याचे शर्मा यांचे म्हणणे आहे. त्यांनी स्पष्ट केले की सध्या हा प्रश्न केवळ अभूजमाडच्या पश्चिमेकडील काही भागांमध्ये आणि सुकमा व बीजापूर जिल्ह्यांच्या दक्षिण भागातच शिल्लक आहे. या प्रगतीमुळे बस्तर परिसरातील लोक आता निर्भयपणे श्वास घेऊ शकतात आणि भितीविना आपले आयुष्य जगू शकतात उपमुख्यमंत्र्यांचे (Vijay Sharma) हे विधान तेव्हा समोर येत आहे जेव्हा बस्तरातील विविध जिल्ह्यांत अनेक माओवादी आत्मसमर्पण केले. पुढे बघता, केंद्र सरकारने मार्च २०२६ पर्यंत माओवादी समस्या पूर्णपणे समाप्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्य हे उद्दिष्ट वेळेत साध्य करेल, असा आत्मविश्वास विजय शर्मा यांनी व्यक्त केला. नक्षलवादात अजूनही सामील असलेल्यांसाठी त्यांनी खुले आवाहन केले की जो कोणी शस्त्रे सोडून मुख्य प्रवाहात परत यायचा निर्णय घेईल, त्याचे स्वागत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची संपूर्ण जबाबदारी सरकार घेईल आणि त्यांना स्थिर आयुष्य मिळण्यासाठी मदत केली जाईल.(Vijay Sharma)
यादरम्यान त्यांनी आत्मसमर्पण करण्यास तयार नसलेल्यांना कठोर इशाराही दिला. जो कोणी शस्त्र हातात घेऊन संघर्ष सुरू ठेवेल, त्याला राज्याच्या प्रशिक्षित सुरक्षा दलांकडून कठोर आणि योग्य प्रतिसाद मिळेल, असे ते म्हणाले. बस्तर, सुकमा, बीजापूर, नारायणपूर, कांकेर या भागात सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात मोहिमा राबवल्या आणि यामुळे जंगलातील नक्षलींची हालचाल मर्यादित झाल्याचे पाहायला मिळतेय.(Vijay Sharma)
बस्तरच्या भविष्याबाबत भाष्य करताना ते म्हणाले, सरकारचा ठाम विश्वास आहे की बस्तरचा ‘जल, जंगल, जमीन’ हा हक्क तेथील लोकांचा, विशेषतः तरुणांचा आहे. बस्तरचे तरुण स्वतःच या प्रदेशाचे भविष्य घडवतील, अशी भावना आता अधिक दृढ होत आहे. ‘बस्तर ऑलिम्पिक्स’ आणि ‘बस्तर पाडुम’ उत्सवातील तरुणांची उत्साहपूर्ण उपस्थिती हे याचे उदाहरण आहे.(Vijay Sharma)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक