Santosh Deshmukh Case : ॲड. निकम हे राजकीय पक्षाशी निगडीत, वकील बदला : सरपंच संतोष देशमुख हत्याकांडातील आरोपी घुलेचा कोर्टात अर्ज

    19-Dec-2025
Total Views |

 Santosh Deshmukh Case


मुंबई : (Santosh Deshmukh Case) सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी शुक्रवारी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता बीड जिल्हा न्यायालयात सुरू झाली. या सुनावणीदरम्यान आरोपी सुदर्शन घुले याने न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. विशेष सरकारी वकील ॲ. उज्ज्वल निकम हे एका राजकीय पक्षाशी निगडीत असल्याने या प्रकरणाच्या निकालावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे त्यांना या खटल्यातून बाजूला करण्यात यावे, अशी मागणी घुलेने केली आहे. (Santosh Deshmukh Case)

सुनावणीच्या सुरुवातीला सरकारी पक्षाचे सहकारी वकील ॲ. बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद मांडला. त्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांना वगळता इतर आरोपींच्या वतीने हा अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. आरोपींचा दावा आहे की, ॲ. उज्ज्वल निकम यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने न्यायप्रक्रियेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. (Santosh Deshmukh Case)



या अर्जाला विरोध करताना ॲ. उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट केले की, कायद्यात अशा प्रकारची कोणतीही तरतूद नाही. केवळ राजकीय संबंधांच्या आरोपावरून विशेष सरकारी वकील बदलण्याचा अधिकार आरोपींना नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला. (Santosh Deshmukh Case)


दरम्यान, आरोपी विष्णू चाटे यांच्या वकिलांनी असा दावा केला की, या प्रकरणात त्यांच्या विष्णू चाटेचा कुठेही ठोस उल्लेख नाही आणि त्यांच्याविरोधात पुरावे उपलब्ध नाहीत. मात्र, सरकारी वकिलांनी हा दावा फेटाळून लावत विष्णू चाटे हा सुरुवातीपासूनच गुन्ह्यात सक्रिय सहभागी असल्याचे सांगितले. वाल्मिक कराडचा निरोप देत तो खंडणी मागत होता, हॉटेल तिरंगा येथे झालेल्या बैठकीत त्याने “संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा” असा निरोप दिला होता, असा गंभीर आरोप सरकारी पक्षाने न्यायालयात केला. (Santosh Deshmukh Case)]



याशिवाय, सरकारी पक्षाकडून ॲडिशनल पुरावे स्वीकारण्याबाबत न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, प्रकरणाशी संबंधित लॅपटॉप फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला असून, त्यातील डाटा रिकव्हरीची प्रक्रिया सुरू आहे. (Santosh Deshmukh Case)