मुंबई : (Karjat-Panvel Railway Line) रायगड-कर्जत-पनवेल या मार्गिकेसाठी (Karjat-Panvel Railway Line) किरवली-वांजळे गावाजवळील ३०० मीटर लांबीच्या नव्या बोगद्याचे (Karjat-Panvel Railway Line) काम आता पूर्ण झाले आहे. हा प्रोजेक्ट मे २०२६ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पनवेल-कर्जत कॉरिडोर तयार करण्यासाठी सुमारे २,७८३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. ही चौथी मार्गिका तयार झाल्यावर, पनवेल ते कर्जत प्रवासाचा वेळ अवघ्या ३० मिनिटांवर येणार आहे.(Karjat-Panvel Railway Line)
कर्जत व पनवेल शहरांचा भविष्यात होणारा विकास लक्षात घेऊन सात-आठ वर्षांपूर्वी मध्य रेल्वेने कर्जत–पनवेल रेल्वेमार्ग (Karjat-Panvel Railway Line) उभारला मात्र हा मार्ग एकेरी मार्ग आणि दीड किमी लांबीचा बोगदा असल्याने या बोगद्यातील ठिसूळ दगड वारंवार कोसळत होते. त्यामुळे मध्य रेल्वेने पनवेल-कर्जत दरम्यान नवीन आणि सुरक्षित मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. यातून चौक ते कर्जत हा पूर्णपणे नवा मार्ग आणि पनवेल ते चौक हा जुना मार्ग वापरून हा प्रकल्प तयार केला जात आहे.हा प्रकल्प तयार झाल्यानंतर पनवेल, मोहोपे, चिखले चौक आणि कर्जत या पाच स्थानकांवर थेट रेल्वे सेवा मिळणार आहे.(Karjat-Panvel Railway Line)
पनवेल-कर्जत उपनगरी रेल्वे मार्ग हा मुंबई-पुणे जुना महामार्गाजवळून जातो, त्यामुळे येथे रोड ओव्हर पुलांचे काम सुरू आहे. हा नवीन मार्ग दोन जुन्या स्थानकांना जोडण्यात येणार आहे. ज्यामध्ये उपनगरातील सर्वात मोठा बोगदा आणि पुलाचा देखील समावेश आहे, याआधी या मार्गावर मालगाड्या आणि काही लांब पल्ल्याच्या गाड्या धावत होत्या, पण आता नव्या दुहेरी मार्गिकेमुळे पनवेलमार्गे कर्जतपर्यंत लोकल ट्रेन धावू शकणार आहेत. त्यामुळे कर्जत, पनवेल भागामध्ये राहणा-यांचा प्रवास सोपा आणि सुसाट होणार आहे.(Karjat-Panvel Railway Line)
२,७८३ कोटींचा निधी मंजूर
सध्या कर्जत ते सीएसएमटीला धिम्या लोकलने येण्यासाठी २ तास १९ मिनिटे लागतात. हा मार्ग कर्जत ते सीएसएमटी व्हाया पनवेल असा जोडला गेल्याने हा लोकल प्रवास १ तास ५० मिनिटांचा होणार आहे. या प्रोजेक्टसाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाला २.७८३ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.(Karjat-Panvel Railway Line) या रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम पाव ते सहा महिन्यात पूर्ण करण्याचे मुंबई रेल्वे विकास महामंडळाने उद्दिष्ट आहे.(Karjat-Panvel Railway Line)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.