मुंबई : (Viksit Bharat Mumbai Marina) केंद्र सरकारने मुंबई हार्बरमध्ये जागतिक दर्जाचा मरीना उभारण्याच्या ८८७ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत किनारी वाहतूक, सागरी पर्यटन आणि वॉटरफ्रंट-आधारित शहरी विकासाला मोठी चालना मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्टीकोनानुसार जागतिक दर्जाची पर्यटनस्थळे विकसित करण्यास आणि भारताच्या सागरी अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याच्या उद्देशाने, बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्रालयाने ‘विकसित भारत मुंबई मरीना’ (Viksit Bharat Mumbai Marina) प्रकल्पास मान्यता दिली आहे.(Viksit Bharat Mumbai Marina)
या प्रसंगी बोलताना केंद्रीय बंदरे, नौवहन व जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल म्हणाले, “ ‘विकसित भारत मुंबई मरीना’ला (Viksit Bharat Mumbai Marina) मिळालेली ही मंजुरी किनारी वाहतूक आणि सागरी पर्यटन बळकट करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प जागतिक दर्जाची पायाभूत सुविधा निर्माण करेल, वॉटरफ्रंट नागरिकांसाठी खुले करेल, खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देईल आणि नव्या रोजगार संधी निर्माण करेल. यामुळे भारताच्या व्यापक ब्लू इकॉनॉमी उद्दिष्टांना गती देत मुंबईला जागतिक सागरी पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळेल.”(Viksit Bharat Mumbai Marina)
हा प्रकल्प हायब्रिड विकास मॉडेलद्वारे राबवला जाणार आहे. त्याअंतर्गत मुंबई पोर्ट प्राधिकरण (MbPA) सुमारे ४७० कोटी खर्चून ईपीसी पद्धतीने मुख्य मरीना पायाभूत सुविधा उभारेल, तर ऑनशोअर सुविधा या ४१७ कोटींच्या अंदाजित गुंतवणुकीसह खासगी ऑपरेटर विकसित करेल. मंत्रालयाने पोर्ट प्राधिकरणाच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली असून निविदा प्रक्रिया सुरू आहे. या निविदेसाठी बोली सादर करण्याची अंतिम तारीख २९ डिसेंबर २०२५ आहे.(Viksit Bharat Mumbai Marina)
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मुंबईला जागतिक मरीना गंतव्य म्हणून उभे करण्याच्या दृष्टीकोनाचे हे प्रतिबिंब आहे. या प्रकल्पामुळे सागरी पर्यटन मजबूत होईल, खासगी गुंतवणूक आकर्षित होईल आणि संलग्न क्षेत्रांमध्ये २,००० हून अधिक रोजगारनिर्मिती होईल, तसेच किनारी व ब्लू इकॉनॉमीतील नव्या संधी उघडतील,” असेही मंत्री सोनोवाल यांनी नमूद केले.(Viksit Bharat Mumbai Marina)
सुमारे १२ हेक्टर जलक्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या या मरीनामध्ये ३० मीटरपर्यंत लांबीच्या ४२४ यॉट्सना धक्का देण्याची क्षमता असेल. सागरी पायाभूत सुविधांमध्ये ॲप्रोच ट्रेसल, पाइल्ड ब्रेकवॉटर, सेवा प्लॅटफॉर्म्स, पॉन्टून्स आणि गॅंगवे यांचा समावेश असेल, जे सुरक्षित आणि कार्यक्षम यॉट ऑपरेशन्ससाठी डिझाइन केलेले असतील.(Viksit Bharat Mumbai Marina)
खासगी ऑपरेटरकडून विकसित होणाऱ्या ऑनशोअर सुविधांमध्ये मरीना टर्मिनल इमारत, ‘नमो भारत’ आंतरराष्ट्रीय नौकानयन शाळा, सागरी पर्यटन विकास केंद्र, हॉटेल व क्लब हाऊस सुविधा, कौशल्य विकास केंद्र, तसेच यॉट स्टॅकिंग आणि दुरुस्ती पायाभूत सुविधा यांचा समावेश असेल. हा प्रकल्प मेरीटाईम इंडिया व्हिजन (MIV) २०३०, मेरीटाईम अमृत काळ व्हिजन (MAKV) २०४७, सागरमाला कार्यक्रम, क्रूझ भारत मिशन तसेच मुंबई पोर्ट प्राधिकरणाचा पोर्ट मास्टर प्लॅन २०४७यांच्याशी सुसंगत आहे.(Viksit Bharat Mumbai Marina)
या मरीना प्रकल्पामुळे (Viksit Bharat Mumbai Marina) मरीना ऑपरेशन्स, क्रूझ सेवा, हॉस्पिटॅलिटी आणि संलग्न क्षेत्रांमध्ये २,००० हून अधिक रोजगार निर्माण होतील. त्याचबरोबर किनारी पायाभूत सुविधांमध्ये खासगी क्षेत्राचा सहभाग वाढेल, वॉटरफ्रंटपर्यंत सार्वजनिक प्रवेश सुधारेल आणि सागरी पर्यटन व क्रूझ ट्रॅफिकसाठी मुंबईची प्रमुख केंद्र म्हणून भूमिका अधिक मजबूत होईल.(Viksit Bharat Mumbai Marina)
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.