मुंबई महापालिका निवडणुक संदर्भात महायुतीची दुसरी बैठक संपन्न
18-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Mumbai Municipal Corporation Election) "मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी (Mumbai Municipal Corporation Election) १५० जागांच्या उमेदवारीबाबत महायुतीचे एकमत झाले असून उर्वरित ७७ जागांची चर्चा सुरू आहे. निवडणुकीदरम्यान (Mumbai Municipal Corporation Election) प्रचारासाठी होणाऱ्या सभा आणि एकूण निवडणूक व्यवस्थापन याबाबत पण विस्तृत आखणी करण्यासाठीची बैठक पूर्ण झाली आहे." असे प्रतिपादन भाजपा अध्यक्ष आमदार अमीत साटम यांनी गुरुवार दि. १८ रोजी केले.(Mumbai Municipal Corporation Election)
मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात (Mumbai Municipal Corporation Election) महायुतीची चर्चेची दुसरी बैठक गुरुवार दि.१८ रोजी वसंत स्मृती दादर येथे पार पडली त्यावेळी ते बोलत होते.(Mumbai Municipal Corporation Election)
यावेळी पत्रकार परिषदेस आमदार अमीत साटम,मंत्री उदय सामंत, मिलिंद देवरा, राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे उपस्थित होते.(Mumbai Municipal Corporation Election)
"भ्रष्टाचार विरहित प्रशासन देणे.मुंबईकरांची सुरक्षा आणि विकास हे मुद्दे आमच्यासाठी महत्वाचे आहेत. कोण किती जागा लढणार हे महत्वाचे नसून सामान्य मुंबईकरांचे प्रश्न सोडवणे महत्वाचे आहे.ज्यांनी मुंबई विकून खाल्ली आणि जे मुंबईला स्वतःची जहागिरी समजत आहेत त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे.मतांच्या लांगुलंचनासाठी काहीजण मुंबईचा रंग बदलत आहेत. ते आम्ही होऊ देणार नाही."असेही साटम म्हणाले.(Mumbai Municipal Corporation Election)
"आमची महायुती घट्ट असून ती कोणताही विषयावरून तुटणार नाही.विधानसभेला आमची १० माणसे धनुष्यबाणावर पण लढली आहेत.कमळ आणि धनुष्यबाण एकच आहेत.ज्या जागावाटपाचा आमच्या स्तरावर निर्णय होणार नाही त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका बदलली तर त्यांचे महायुतीत स्वागतच आहे.पण नवाब मलिक यांच्या नेतृत्वात कधीही चर्चा होणार नाही." असे स्पष्टीकरण साटम यांनी केले.(Mumbai Municipal Corporation Election)
"मी आजारी असल्याने पहिल्या बैठकीत नव्हतो. पण आमच्यात बंडखोरी नाही.तसे असते तर १५० जागांवर एकमत झाले नसते. त्यामुळे शिवसेनेची भूमिका भाजपाच्या भूमिकेपेक्षा वेगळी नाही. जर तरच्या गोष्टीला काही अर्थ नाही." असे मत मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.(Mumbai Municipal Corporation Election)