मुंबई : (Gen-Z Post Office) पोस्ट ऑफिस म्हटलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो पारंपरिक काउंटर, रांगा आणि कागदी व्यवहारांचा अनुभव. मात्र हीच संकल्पना आता पूर्णपणे बदलण्याच्या दिशेने इंडिया पोस्टने एक मोठं पाऊल टाकलं आहे. आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये सुरू होणारे मुंबईतील पहिले-वहिले ‘जेन-झी पोस्ट ऑफिस’ (Gen-Z Post Office) ही केवळ एक सेवा नसून, तरुण पिढीसाठी घडवलेला एक नवा अनुभव आहे.(Gen-Z Post Office)
आज दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी उद्घाटन होणारे हे जेन-झी पोस्ट ऑफिस, (Gen-Z Post Office) इंडिया पोस्टच्या आधुनिकीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. दिल्ली, केरळ, गुजरात, बिहार आणि आंध्र प्रदेशात यशस्वीपणे राबवलेल्या या संकल्पनेनंतर मुंबईत विशेषतः आयआयटीसारख्या ज्ञानकेंद्रात हा उपक्रम सुरू होणं, हे प्रतीकात्मकदृष्ट्याही महत्त्वाचे आहे.या उद्घाटन सोहळ्याला महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्टमास्तर जनरल अमिताभ सिंह आणि मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक कैया अरोरा यांची प्रमुख उपस्थिती होती. याचसोबत आयआयटी मुंबईचे रजिस्ट्रार, इंडिया पोस्टचे अधिकारी-कर्मचारी तसेच आयआयटी मुंबई समुदायाचे सदस्य यावेळी उपस्थित होते.(Gen-Z Post Office)
तंत्रज्ञान हा या जेन-झी पोस्ट ऑफिसचा (Gen-Z Post Office) कणा आहे. पूर्णतः क्यूआर आधारित डिजिटल सेवा, मोफत वाय-फाय, आधार नोंदणी व अद्ययावत सुविधा, पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक योजनांबाबत मार्गदर्शन, तसेच पार्सल व लॉजिस्टिक्स सेवांची माहिती देणारे ‘पार्सल ज्ञान पोस्ट’ या सर्व सुविधा तरुणांच्या गरजांनुसार आखण्यात आल्या आहेत. संगीतप्रेमींसाठी स्वतंत्र म्युझिक कॉर्नर आणि फिलॅटेलीमध्ये रस असणाऱ्यांसाठी निवडक साहित्यही येथे उपलब्ध आहे.(Gen-Z Post Office)
विद्यार्थ्यांसाठी स्पीड पोस्टवर १० टक्के आणि बल्क पार्सलवर ५ टक्के सवलत देऊन, इंडिया पोस्टने तरुणांना थेट आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. वारसा आणि नवोन्मेष यांचा संगम साधत, पोस्ट ऑफिसला व्यवहारांच्या चौकटीतून बाहेर काढून अनुभवाचं केंद्र बनवण्याचा हा प्रयोग आहे. जेन-झी पोस्ट ऑफिसच्या (Gen-Z Post Office) माध्यमातून इंडिया पोस्टने हे स्पष्ट केलं आहे की, बदलत्या पिढीसोबत बदलणं हीच भविष्यातील सार्वजनिक सेवेची खरी ओळख आहे.(Gen-Z Post Office)
Gen Z पोस्ट ऑफिसची प्रमुख वैशिष्ट्ये:
• मोफत वाय-फाय सुविधा
• कॅफेटेरिया-स्टाईल बसण्याची व्यवस्था व मिनी लायब्ररी
• स्वतंत्र म्युझिक कॉर्नर
• पार्सल व लॉजिस्टिक्स सेवांविषयी माहिती देणारे ‘पार्सल ज्ञान पोस्ट’
• पूर्णतः डिजिटल, QR-आधारित सेवा प्रणाली
• आधार नोंदणी व अद्ययावत सुविधा
• पोस्ट ऑफिस सेव्हिंग्स बँक (POSB) योजनांबाबत मार्गदर्शन
मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.