Mumbai Central : रेल्वे स्थानकात बसून करा ऑफिसचे काम

मुंबई सेंट्रल येथे अत्याधुनिक डिजिटल लाऊंज व को-वर्किंग स्पेस

Total Views |
Mumbai Central
 

मुंबई : (Mumbai Central) मुंबईसारख्या धावत्या महानगरात वेळ हीच सर्वात मौल्यवान गोष्ट आहे. प्रवासादरम्यान वेळ वाया न घालवता तो उपयुक्त कसा ठरवता येईल, याच विचारातून पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल स्थानकावर (Mumbai Central) प्रवाशांसाठी डिजिटल लाऊंज व को-वर्किंग स्पे ही अभिनव सुविधा सुरू केली आहे.(Mumbai Central)
 
मुंबई सेंट्रलच्या (Mumbai Central) मुख्य इमारतीत उभारलेला हा डिजिटल लाऊंज सुमारे १७०० चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेला असून, आधुनिक डिझाइन आणि शांत वातावरण यांचे सुरेख मिश्रण येथे पाहायला मिळते. विशेषतः कार्यालयीन कामासाठी प्रवास करणारे व्यावसायिक, कॉर्पोरेट प्रवासी, फ्रीलान्सर्स आणि स्टार्टअप्ससाठी ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.(Mumbai Central)
 
या डिजिटल लाऊंजमध्ये हाय-स्पीड वाय-फाय, अनेक चार्जिंग पॉइंट्स, आरामदायी सोफे, एर्गोनॉमिक खुर्च्या, स्वतंत्र डेस्क्स, शांत केबिन्स आणि मीटिंग रूम्स उपलब्ध आहेत. उत्तम प्रकाश व्यवस्था व वातानुकूलनामुळे येथे काम करताना कार्यालयासारखाच अनुभव मिळतो. प्रवासातील प्रतीक्षेचा वेळ आता ई-मेल्स, व्हर्च्युअल मीटिंग्स किंवा महत्त्वाच्या प्रेझेंटेशन्ससाठी वापरता येणार आहे.(Mumbai Central)
 
हेही वाचा : Indian Railway Catering and Tourism Corporation : वंदे भारत व अमृत भारत गाड्यांमध्ये आता चविष्ट भोजन 
 
या प्रकल्पासाठी सुमारे ₹३.२० कोटींचा खर्च करण्यात आला असून, तो पश्चिम रेल्वेच्या गैर-भाडे उत्पन्न वाढीसही हातभार लावणार आहे. प्रवासी सुविधांचा दर्जा उंचावतानाच, रेल्वे स्थानकांना केवळ प्रवासाचे केंद्र न ठेवता ‘वर्क-फ्रेंडली स्पेस’ म्हणून विकसित करण्याचा हा प्रयत्न आहे. डिजिटल लाऊंजच्या माध्यमातून पश्चिम रेल्वेने (Mumbai Central) प्रवाशांच्या बदलत्या गरजांची दखल घेतली असून, ‘प्रवास आणि काम’ यांचा समतोल साधणारा हा उपक्रम भविष्यातील स्मार्ट रेल्वे स्थानकांचा दिशादर्शक ठरणार आहे.(Mumbai Central)
 
डिजिटल लाऊंज : ठळक वैशिष्ट्ये
 
प्रवासातही ऑफिससारखा अनुभव
वेळ वाया न घालवता थेट कामाची सोय
हाय-स्पीड वाय-फाय व मल्टी चार्जिंग पॉइंट्स
एर्गोनॉमिक खुर्च्या व आरामदायी सोफे
शांत केबिन्स व मीटिंग रूम्स
वातानुकूलित व पुरेसे प्रकाशमान वातावरण
 

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.