Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign : संविधान अमृत महोत्सवी जनजागृती अभियानांतर्गत राज्यस्तरीय संविधान प्रश्नमंजुषेचे आयोजन
18-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign) संविधान अमृत महोत्सवी जनजागृती अभियानांतर्गत (Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign) आयोजित संविधान प्रश्नमंजुषा–२०२५ या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संविधानाचे (Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign) महत्त्व, त्यातील मूलभूत अधिकार व कर्तव्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी दिली. दीक्षाभूमीजवळील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते.(Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign)
ही प्रश्नमंजुषा महाराष्ट्र राज्यातील इयत्ता आठवीपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असून स्पर्धा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना www.yuvacareer.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे. या संकेतस्थळावर स्पर्धेची सविस्तर माहिती, नोंदणी प्रक्रिया, ऑनलाईन प्रशिक्षण तसेच अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.(Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign)
ही स्पर्धा मराठी, हिंदी व इंग्रजी अशा तीन भाषांमध्ये घेण्यात येणार असून विद्यार्थ्यांना इच्छेनुसार भाषा निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ९९ रुपये शुल्क निश्चित करण्यात आले असून शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे व आश्रमशाळांमार्फत हे शुल्क भरावे लागणार आहे. केवळ महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थीच या उपक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत.(Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign)
नोंदणीची अंतिम तारीख ३१ डिसेंबर असून मॉक टेस्ट २० जानेवारी २०२६, पहिली फेरी २२ जानेवारी २०२६ तर अंतिम फेरी प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. स्पर्धेत प्रथम पुरस्कार १ लाख रुपये, द्वितीय पुरस्कार ५१ हजार रुपये आणि तृतीय पुरस्कार ११ हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र स्वरूपात दिले जाणार असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.(Constitution Amrit Mahotsav Awareness Campaign)