Shiv Sena : शिवसेनेतून निवडणूक लढवण्यासाठी महिला इच्छुकांची विक्रमी गर्दी

    18-Dec-2025
Total Views |
Shiv Sena
 
मुंबई : (Shiv Sena) मुंबई महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतून (Shiv Sena) निवडणूक लढवण्यासाठी हजारो इच्छुकांनी गर्दी केली आहे. शिवसेनेकडून आज इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.(Shiv Sena)
 
त्यात २७०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखत दिल्याची माहिती शिवसेना (Shiv Sena) नेते व माजी खासदार राहुल शेवाळे यांनी गुरुवार दि.१८ रोजी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, शिवसेना(Shiv Sena) उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.(Shiv Sena)
 
हेही वाचा : Mumbai Municipal Corporation Election : महापालिकेच्या १५० जागांबाबत महायुतीचे एकमत - आमदार अमीत साटम 
 
शेवाळे म्हणाले की,"महापालिका निवडणुकीत शिवसेना (Shiv Sena) पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी हजारो इच्छुक आहेत. पालिका निवडणूक शिवसेना (Shiv Sena) महायुती म्हणूनच लढणार आहे मात्र निवडणुकीत योग्य उमेदवार असावा यासाठी पक्षाकडून आज रंगशारदा येथे मुलाखत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील लोकसभा मतदार संघनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. पक्षाकडून तीन निरीक्षकांची यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी राज्यात आणि मुंबईत केलेल्या विकास कामांनी एक छाप पाडली आहे. त्यामुळे शिवसेनेला विजयाची खात्री आहे. शिंदे यांचा प्रभाव असल्याने शिवसेनेकडे (Shiv Sena) इच्छुकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे."(Shiv Sena)