मुंबई : (Indian History Compilation Committee) भारतीय इतिहास संकलन समिती, (Indian History Compilation Committee) कोकण प्रांत आणि बोरिवली सांस्कृतिक केंद्र आयोजित इतिहास कट्टयाच्या तिसऱ्या पर्वातील पहिल्या व्याख्यानाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. ‘एक होता राजा' या व्याख्यानमालेच्या अंतर्गत 'मगध-मौर्य साम्राज्याचे वैभव' या विषयावर प्रसिद्ध पुरातत्वतज्ञ व लेखक डॉ. सूरज पंडित यांनी श्रोत्यांना मार्गदर्शन केले. बोरिवली सांस्कृतिक केंद्राचे उपाध्यक्ष सुनील गणपुले व भारतीय इतिहास संकलन समितीच्या कोकण प्रांताचे सचिव चंद्रकांत जोशी यांनी या प्रसंगी डॉ.सूरज पंडित यांचे स्वागत केले.(Indian History Compilation Committee)
भारतीय इतिहास संकलन समिती, (Indian History Compilation Committee) कोकण प्रांत बोरिवली भाग व बोरिवली सांस्कृतिक केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जनसेवा केंद्र, बोरिवली यांच्या मुख्य प्रायोजकत्वाखाली "इतिहास कट्टा " (Indian History Compilation Committee) हा उपक्रम गेल्या तीन वर्षांपासून बोरिवलीत यशस्वीपणे चालवला जात आहे. 'मगध-मौर्य साम्राज्याचे वैभव' या व्याख्यानामध्ये डॉ. सूरज पंडित यांनी सुमारे २६०० वर्षांपूर्वीच्या मौर्य साम्राज्यातील १६ महाजनपदांपैकी मगध महाजनपद कसे सर्वात शक्तिशाली होते, याचा सविस्तर आढावा घेतला. गंगा, गंडकी, कोशी व सोन नद्यांमुळे समृद्ध झालेल्या मगध साम्राज्याचा विस्तार काशी, कोसल, वज्जी, मल्ल व अंग जनपदांपर्यंत झाल्याचेही त्यांनी सांगितले.कौटिल्याच्या अर्थशास्त्र व ग्रीक प्रवासी मेगॅस्थेनिसच्या इंडिका या ग्रंथांमधून मौर्यकालीन समाजरचना व प्रशासनाची माहिती मिळते, असेही त्यांनी नमूद केले. वैशाली येथील अशोककालीन स्तूप, पाटणा परिसरातील उत्खननातील अवशेष व टेराकोटा मूर्ती यांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. पालघर जवळील चिंचणी येथील पाटली नावाच्या स्त्रीच्या पुत्राने मगधात बांधून घेतलेल्या भिंतीचा इतिहास आहे. त्यानंतर त्या राज्याच्या राजधानीचे नाव पाटलीपुत्र (पाटलीपट्टण, आताचे पटना/पाटणा) असे झाले, हा इतिहास सुद्धा डॉ. पंडित यांनी सांगितला.'एक होता राजा' ही बालपणापासून परिचित असलेली संकल्पना केंद्रस्थानी ठेवूनच व्याख्यानमालेचे नामकरण करण्यात आल्याचे डॉ. रविराज पराडकर यांनी प्रस्तावनेत सांगितले. प्रश्नोत्तरांनंतर आभारप्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला शंभरहून अधिक इतिहासप्रेमी स्त्रीपुरुष व विद्यार्थी उपस्थित होते.(Indian History Compilation Committee)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.