साठ्ये महाविद्यालयात उलगडणार 'पुरातत्तव पंधरवडा'

‘पुरातत्त्व महा- प्रदर्शन २०२५’च्या माध्यमातून संस्कृतीचा जागर

    17-Dec-2025
Total Views |

01
 
मुंबई : (sathaye college) पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्वशास्त्र आणि बौद्ध अध्ययन विभाग, भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सहआयोजनाने, तसेच अश्वमेध प्रतिष्ठान, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, जनसेवा समिती, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीज, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई विद्यापीठ, इतिहास संकलन समिती, शिवगर्जना प्रतिष्ठान, मराठीदेशा फाउंडेशन आणि पुरासंस्कृती यांच्या सहकार्याने बहुप्रतीक्षित ‘पुरातत्त्व महा- प्रदर्शन २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे.

पुरातत्त्व पंधरवड्या अंतर्गत आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन, भारतीय पुरातत्त्वशास्त्रातील आदरणीय व्यक्तिमत्त्व डॉ. एच. डी. सांकळिया यांच्या ११७व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेले आहे. दि. १८ डिसेंबर ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीमध्ये र्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या साठये महाविद्यालय (स्वायत्त), येथे भरवले जाणार असून, दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत सर्वांसाठी खुले असेल.

दगडी अवजारे, तांब्याची भांडी, प्राचीन काळातील वस्तू इथ पासून ते शिवकालीन शस्त्रास्त्रांचा भव्य संग्रह प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. विविध कालखंडांतील व राजवंशांतील प्राचीन नाणी, शिल्पे, चित्रं यांची सुद्धा माहिती या वेळी प्रेक्षकांना होणार आहे. शिक्षण, मनोरंजन आणि सांस्कृतिक अनुभव यांचा उत्तम संगम असलेले हे प्रदर्शन सर्व वयोगटांसाठी आयोजित केले आहे. हे उत्कंठावर्धक प्रदर्शन आपल्या वारशाविषयी आदर वाढवेल आणि मानवीय उत्क्रांतीच्या इतिहासातील विविध टप्प्यांविषयी सखोल अंतर्दृष्टी देईल.