Forts in Maharashtra : गडकिल्ल्यांचे पावित्र्य, सौंदर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अतिक्रमणे काढणे आवश्यक - मंत्री आशिष शेलार

या निर्णयाने शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण

    17-Dec-2025
Total Views |

Forts in Maharashtra 
 
मुंबई : (Forts in Maharashtra) "गडकिल्ल्यांचे (Forts in Maharashtra) पावित्र्य, सौंदर्य आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तेथील अतिक्रमणे काढणे आवश्यक आहे.तसेच राज्यस्तरीय संरक्षित स्मारकाबाबत आणि महापुरुषांच्या जन्मस्थानाबाबत पावित्र्य रहावे यासाठीही योग्य ती कारवाई आवश्यक आहे." असे प्रतिपादन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी बुधवार दि.१७ रोजी मंत्रालय मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना केले.(Forts in Maharashtra)
 
गडकिल्ल्यांवरील (Forts in Maharashtra) अनधिकृत अतिक्रमणे हटवण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवार दि.१७ रोजी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन एका उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून, यात सांस्कृतिक मंत्री अध्यक्षस्थानी आहेत, तर महसूल मंत्री सह-अध्यक्ष आहेत. मंत्री नितेश राणे यांनाही या समितीचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.(Forts in Maharashtra)
 
"गडकिल्ल्यांवर (Forts in Maharashtra) अतिक्रमणे करून अनधिकृत थडगे बांधणे आणि हिरवी चादर टाकणे हे काम जे लोक करतात. ते काढण्याची जबाबदारी ज्या कमिटीची आहे त्यात मला घेतल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा आभारी आहे. वर्षानुवर्षे जे हिंदुत्ववादी कार्यकर्ते याकामासाठी आंदोलने करीत आहेत, संघर्ष करीत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने ही कमिटी मोठा हातभार लावेल."असे प्रतिपादन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केले.(Forts in Maharashtra)
 
हेही वाचा : Delhi Air Pollution : दिल्लीतील वाढत्या प्रदूषणावर सरकारचा मोठा निर्णय; सरकारी व खासगी संस्थांमध्ये ५० टक्के वर्क फ्रॉम होम बंधनकारक
 
"छ्त्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास पुसण्याचे काम अशी थडगी उभे करून,हिरवी चादर टाकून केले जात होते.गडकिल्ले (Forts in Maharashtra) जिहाद मुक्त करण्याची चांगली जबाबदारी या समितीच्या निमित्ताने आमच्यावर आली असल्याने त्या संधीचे सोने आम्ही निश्चित करू.कारण अशा ठिकाणी अनधिकृत बांधकामे करून धर्माच्या नावाखाली अनेक वेळा हत्यार पण सापडली आहेत. देशविरोधी कारवाई करणारे लोक पण याचा आश्रय घेताना आढळले आहेत."असेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले.(Forts in Maharashtra)
 
" छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे आमचे दैवत आहेत.त्यांनी जो हिंदवी स्वराज्याचा इतिहास घडविला आहे त्यावर कोण अशी हिरवी आक्रमण करीत असेल.तर ते आक्रमण काढण ही आमची जबाबदारी आहे. हिंदुत्व या विषयावर तडजोड होणार नाही.अशी अतिक्रमणे कुठे आहेत याची पूर्ण माहिती आमच्याकडे आहे.त्यांनी ती स्वतःहून काढून घ्यावीत कारण आमचा बुलडोझर ऐकणार नाही."असेही नितेश राणे म्हणाले.(Forts in Maharashtra)