Vanvasi Kalyan Ashram School : वनवासी कल्याण आश्रम शाळा माणगाव येथे रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
17-Dec-2025
Total Views |
रायगड : (Vanvasi Kalyan Ashram School) वनवासी कल्याण आश्रम शाळा,(Vanvasi Kalyan Ashram School) माणगाव येथे दिनांक १३ व १४ डिसेंबर रोजी दोन दिवसीय रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेचे उद्घाटन महिला, बालकल्याण व युवक कल्याण समितीच्या सभापती नंदिनी नितीन बामगुडे यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्या भारती महाळुंगे उपस्थित होत्या.(Vanvasi Kalyan Ashram School)
कार्यशाळेत इयत्ता सहावी ते आठवीतील २५ मुले व २५ मुलींनी सहभाग घेतला. संस्कार भारतीच्या कार्यकर्त्या सुचिता चापनेरकर, प्रतिभा करंदीकर व सतीश थवे यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या रांगोळ्यांचे प्रशिक्षण दिले.(Vanvasi Kalyan Ashram School)
शाळेचे मुख्याध्यापक उत्तम पाटील व अरुण पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृह अधिक्षिका मीनाक्षी कांबळे यांनी केले. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त (Vanvasi Kalyan Ashram School) विद्यार्थ्यांनी विशेष रांगोळी साकारली. समारोपप्रसंगी प्राथमिक विभागाच्या शिक्षिका प्रवीण पाटील यांनी आभार मानले.(Vanvasi Kalyan Ashram School)