Mangalprabhat Lodha : सैफी हॉस्पिटल प्रशासनाची मनमानी चालू देणार नाही

मंत्री मंगलप्रभात लोढा; केळेवाडी पुल होणारच

    16-Dec-2025   
Total Views |
Mangalprabhat Lodha
 
मुंबई : (Mangalprabhat Lodha) सैफी हॉस्पिटलची मनमानी चालू देणार नाही. चर्नी रोड केळेवाडी पुल पूर्णत्वास गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी परखड भूमिका कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी सोमवारी मांडली.
 
गिरगावकरांनी सैफी हॉस्पिटलसमोर केलेल्या आंदोलनात ते सहभागी झाले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. गेली तीन वर्ष गिरगावमधील चर्नी रोड ते केळेवाडीपर्यंत पुल व्हावा, यासाठी मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी लढा दिला. मुंबई महापालिकेकडे या पुलाचा पाठपुरावा करून त्यांनी मान्यता मिळवली. त्यासाठी निधीची तरतूद देखील झाली. मात्र, सैफी हॉस्पिटलने या पुलाच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने गिरगावकरांच्या प्रश्नाची दखल घेऊन मुंबई महपालिकेला पूल बांधण्यास परवानगी दिली. पालिकेने पुलाचे कामही सुरू केले. पुलाचे ६० टक्के काम पूर्ण होत असतानाच, पुन्हा सैफी हॉस्पिटल प्रशासनाने यात अडवणूक केली आहे. याविरोधात गिरगावकरांनी केलेल्या आंदोलनात मंत्री लोढा  (Mangalprabhat Lodha) यांनी सहभाग घेऊन गिरगावकरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार व्यक्त केला. (Mangalprabhat Lodha)
 
हेही वाचा : Central Railway : मुंबईकरांचा लोकल प्रवास आणखी सुखद 
 
पालिकेने दबावाखाली न येता पुलाचे काम सुरू करावे
 
स्थानिकांना कोणतीही सूचना न देता आता या पुलाचे काम थांबवण्यात आले आहे. यासंदर्भात मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी पालिका मुख्यालयात बैठक घेऊन सह आयुक्त चंद्रशेखर चोरे यांना याचा जाबही विचारला होता. मात्र, त्यांनी असमाधानकारक उत्तर दिले. पालिकेने कोणाच्याही दबावाखाली न येता न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा पुलाचे काम सुरू करावे, असे आदेश मंत्री लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी दिले आहेत. तसेच जो पर्यंत पुलाचे काम पूर्ण होत नाही, तो पर्यंत याचा पाठपुरावा करतच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. (Mangalprabhat Lodha)
 
 
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....