Chandrashekhar Bawankule : ५१ टक्के मते घेऊन दोन तृतीयांश बहुमताने जिंकण्याची आमची तयारी; मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    16-Dec-2025   
Total Views |
Chandrashekhar Bawankule
 
मुंबई : (Chandrashekhar Bawankule) ५१ टक्के मते घेऊन दोन तृतीयांश बहुमताने जिंकण्याची आमची तयारी असून लोकांची महायुतीला पसंती आहे, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
 
माध्यमांशी बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले की, "भाजप आणि शिवसेना महायुती आहे. अनेक ठिकाणी बोलणी सुरू झाली आहे. भाजप आणि शिवसेनेची बोलणी झाल्यानंतर इतर १३ मित्रपक्षांशी आम्ही चर्चा करणार आहोत. मागच्या १५ वर्षांपासून युवा स्वाभिमान पक्ष महायुतीचा भाग आहे. त्यांचा आम्हाला प्रस्ताव आला असून अमरावतीमध्ये आम्ही महायुतीतच लढणार आहोत."(Chandrashekhar Bawankule)
 
आदित्य ठाकरेंनी संधीचे सोने करावे
 
"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी मुलाला प्रोमोट केले होते. त्यात नवीन काही नाही. आदित्य ठाकरे नवीन नेतृत्व आहेत. त्यांच्याकडे संधी असून त्यांनी संधीचे सोने करावे," असेही ते म्हणाले.(Chandrashekhar Bawankule)
 
हेही वाचा : Mass conversion : ख्रिसमसच्या दिवशी सामूहिक धर्मांतराचे नियोजन  
 
संजय राऊत यांच्याकडे मुद्दे नाहीत
 
"संजय राऊत यांच्याकडे बोलायला मुद्दे नाहीत. विकसित मुंबईचा प्लान काय आहे, ते त्यांना माहिती नाही. त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही. सकाळी झोपून उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत टोमणे मारण्याचा त्यांचा कार्यक्रम आहे. जोपर्यंत चंद्र, सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच आहे हे जनतेला माहिती आहे. पण दिवसभर टीव्हीवर चर्चेत राहण्यासाठी संजय राऊत अशी वक्तव्ये करतात," असेही मंत्री बावनकुळे (Chandrashekhar Bawankule)म्हणाले.
 
जनाधार संपतो तेव्हा समीकरणे तयार होतात
 
"उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे चांगले समीकरण आहे. जेव्हा जनाधार संपतो तेव्हा अशी समीकरणे तयार होतात. त्यामुळे त्यांनी एकत्र यायला मनाई नाही. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत."(Chandrashekhar Bawankule)
 
"२०२९, २०३५ आणि २०४७ च्या विकसित मुंबईचा प्लान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या प्लॅनचा विचार केल्यास मुंबई हे जगातील सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही. या योजनेसमोर मते मागणारे फिके पडणार असून त्यांचे डिपॉझिट जप्त होणार आहे. त्यामुळे ते अशी वक्तव्ये करतात. राज्यातील २९ महानगरपालिकेवर भाजप महायुतीचे महापौर असतील," असा विश्वासही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.
 

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....