Namrata Koli : भाजपच्या नगरसेविका नम्रता कोळी यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन
16-Dec-2025
Total Views |
ठाणे : (Namrata Koli) भाजपच्या प्रभाग क्रमांक २२ मधील नगरसेविका नम्रता जयेंद्र कोळी (Namrata Koli) यांनी गेल्या पाच वर्षात केलेल्या विकासकामांच्या कार्य अहवालचे प्रकाशन भाजपचे आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे तसेच भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांच्या हस्ते करण्यात आले. गेल्या पाच वर्षात नम्रता कोळी (Namrata Koli) यांनी प्रभागात केलेली विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये नेहमीच आघाडीवर असलेल्या कोळी यामुळेच जनतेच्या खऱ्या लोकप्रतिनिधी आहेत, अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्यांनी दिली आहे.(Namrata Koli)
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील भाजप नगरसेविका नम्रता कोळी (Namrata Koli) यांनी त्यांच्या पाच वर्ष कालावधीत तसेच महापालिकेची मुदत संपल्यानंतरही कामाचा वेग तसाच सुरू ठेवला. यामध्ये पाच रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण, प्रभागातील चौदा कुटुंबांना हक्काचा निवारा देण्याचे महत्वाचे काम नम्रता कोळी यांनी केले आहे. प्रभागात उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी त्यांनीच पुढाकार घेतला आहे. मोफत आरोग्य तपासणी, ज्येष्ठ नागरिकांना काठीचे व वेदनामुक्त पिशवीचे वाटप, महापालिका तसेच महापालिकेच्या ज्या अनेक योजना आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम नम्रता कोळी (Namrata Koli) यांनी केले आहे.(Namrata Koli)
याशिवाय विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि पुस्तकांचे वाटप, असे शैक्षणिक उपक्रम राबवण्याबरोबरच प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी त्या नेहमीच आघाडीवर असतात. स्थायी समिती सदस्य असताना त्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधले होते. पालिकेची मुदत संपूनही त्या लोकांच्या संपर्कात होत्या. सोमवारी त्यांच्या कार्याचा अहवालाचे प्रकाशन आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संदीप लेले, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी, युवा मोर्चा अध्यक्ष समर्थ नायक यांच्या प्रमुख उपस्थित झाले. गेल्या आठ वर्षात त्यांनी केलेली विकासकामे आणि त्यांचा जनतेशी असलेला संपर्क यामुळे त्या खऱ्या अर्थाने जनतेच्या लोकप्रतिनिधी आहेत, असा विश्वास आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे आणि जिल्हाध्यक्ष संदीप लेले व्यक्त केला.(Namrata Koli)
यावेळी ज्येष्ठ नेते विलास साठे, भाजप ठाणे शहर सरचिटणीस सचिन पाटील, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस समीरा भारती, भाजपा ठाणे शहर सरचिटणीस विक्रम भोईर, ओबीसी मोर्चा अध्यक्ष घनश्याम भुयार, मनोहर सुगदरे, भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष राजेश गाडे व भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष महेश कदम, महिला मोर्चा सरचिटणीस स्नेहा शिंदे, महिला मोर्चा सरचिटणीस विद्या शिंदे, यांनी व वअर्चना पाटील, नौपाडा मंडळ अध्यक्ष रोहित गोसावी, नौपाडा मंडळ सरचिटणीस प्रतिक सोळंकी, अमित पाटील, नितेश तेली, नरेश ठाकूर, अन्वेष जयगडकर, नयन दळवी व भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.(Namrata Koli)