Ameet Satam : पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन चे आमदार अमीत साटम यांच्या हस्ते उद्घाटन
16-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Ameet Satam) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई पश्चिम विभाग, मुख्य निमंत्रक, सहनिमंत्रक व मुख्याध्यापक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा आयोजित “पी. पश्चिम विभाग विज्ञान प्रदर्शन २०२५–२०२६” चा उद्घाटन सोहळा आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांच्या हस्ते मंगळवार दि.१६ रोजी संपन्न झाला. (Ameet Satam)
"विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, प्रायोगिक प्रकल्प व विज्ञान- तंत्रज्ञानावरील सर्जनशील मांडणी अत्यंत प्रेरणादायी होती." असे मत आमदार अमीत साटम (Ameet Satam) यांनी व्यक्त केले. (Ameet Satam)
वर्सोवा वेल्फेअर असोसिएशन हायस्कूल, हरमिंदर सिंग रोड, आराम नगर, वर्सोवा, अंधेरी (पश्चिम) येथे दिनांक १६, १७ व १८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित हे विज्ञान प्रदर्शन “विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM” या संकल्पनेवर आधारित आहे. (Ameet Satam)
या उद्घाटन समारंभात मुख्य अतिथी शास्त्रज्ञ जयबाळ नदूवाथ, प्रमुख मार्गदर्शक माहेश माळी, प्रदर्शन प्रमुख आशिष वाशी, वर्सोवा वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष अरुण जी देव, व्यवस्थापकीय ट्रस्टी राजन चांदोक, ममता थोरात, ट्रस्टी अनिल सिंग, डॉ. क्षितीज मेहता, कुमुद चावरे, रवींद्र मिश्रा, राकेश सिंग, मुख्याध्यापक उठेशोर आठवले, के/प पश्चिम विभागाच्या उपनिरीक्षक निशा वैद, सैफी लईक आदी मान्यवर, पालकवर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (Ameet Satam)