Mumbai Municipal Corporation Election : महायुतीत नवाब मलिक नकोच! भाजप ठाम, ठाकरेंची मुस्लीम मतांसाठी एमआयएमशी जवळीक

मुंबई महापालिका निवडणुकीत महायुतीत नवाब मलिक नकोच."याचा पुनरुच्चार मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार दि.१६ रोजी केला.

    16-Dec-2025
Total Views |
Mumbai Municipal Corporation Election
 
मुंबई : (Mumbai Municipal Corporation Election) मुंबई महापालिका निवडणूक (Mumbai Municipal Corporation Election) जागावाटप संदर्भात भाजप आणि शिवसेनेची पहिली बैठक दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात मंगळवार दि.१६ रोजी संपन्न झाली.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार ) कोणालाही आमंत्रण न्हवते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव नलावडे यांनी भाजपा नेते आशिष शेलार यांची मंगळवार दि.१६ रोजी भेट घेतली होती.यानंतरही नवाब मलिक यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महापालिका निवडणुकीतील (Mumbai Municipal Corporation Election) सहभागाबाबत शेलार यांनी पक्षाची विरोधाची भूमिका कायम ठेवली आहे.आता मुंबईत महायुतीत राष्ट्रवादी असणार नाही हे निश्चित झाले आहे.(Mumbai Municipal Corporation Election) 
 
भाजपाच्या वतीने मंत्री आशिष शेलार, मुंबई अध्यक्ष आमदार अमीत साटम, आमदार प्रवीण दरेकर ,आमदार अतुल भातखळकर तर शिवसेनेच्या वतीने राहुल शेवाळे, मंत्री योगेश कदम,शीतल म्हात्रे, प्रकाश सुर्वे उपस्थित होते. भाजपकडून अबकी बार शंभरी पार चा नारा देत १५० हून अधिक जागा लढवण्याचा निश्चय केला आहे तर शिवसेनेने सुद्धा १२५ जागांची मागणी केलेली होती. भाजपाचे नेते आम्हीच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे असे सांगत आहेत. शिवसेनेला ७० च्या आसपास जागा सोडण्यास ते तयार असल्याचे समजते.(Mumbai Municipal Corporation Election)
 
"मुंबई महाराष्ट्राचीच आणि मराठी माणसाचीच आहे. उबाठासोबत जे जे जातील त्यांच्या पराभवाचा मुहुर्त मराठी माणसानं ठरवलाय.१५० पेक्षा जास्त नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडणूक आणणे हा महायुतीचा फॉर्म्युला आहे."असे मत मंत्री आशिष शेलार यांनी मंगळवार दि.१६ रोजी महायुतीची बैठक झाल्यावर व्यक्त केले.(Mumbai Municipal Corporation Election)
 
हेही वाचा : PM Narendra Modi: जॉर्डन दौऱ्याचा दुसरा दिवस: पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारत–जॉर्डनची भूमिका समान असल्याचे केले स्पष्ट
 
"भाजपची भूमिका पहिल्यापासून स्पष्ट आहे आणि त्यामुळे नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीशी युतीचा प्रश्नच येत नाही." असे प्रतिपादन भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी केले आहे.(Mumbai Municipal Corporation Election)
दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीबाबत खासदार संजय राऊत यांनी शिवतीर्थ येथे राज ठाकरे यांची मंगळवार दि.१६ रोजी भेट घेतली. तसेच ठाकरेंच्या दोन्ही पक्षांकडून महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Corporation Election) प्रचार सभेसाठी अर्ज देखील केले गेले आहेत.सभा वेगवेगळी की संयुक्त होणार हे नंतरच कळेल. काँग्रेसच्या एकला चलो ची भूमिका आणि शरद पवार गटाची महाविकास आघाडीत मनसेबाबत ची भूमिका यावर पुढची गणिते अवलंबून असणार आहेत.(Mumbai Municipal Corporation Election)
 
"जिथे आमचे लोक निवडून येणार नाहीत, आमचे उमेदवार नाहीत तिथे उबाठा ला मदत करतील. उद्धव ठाकरेंनी एक मुस्लिम आमदार निवडून पण आणला होता. महाविकास आघाडीतील एक पक्ष आमच्यासोबत आघाडी करायला तयार आहे असा प्रस्ताव दिला होता."असे वक्तव्य एम आय एम चे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी मंगळवार दि.१६ रोजी एका माध्यमाच्या मुलाखतीत केले आहे.(Mumbai Municipal Corporation Election)
 
जे हिंदूत्वाचे नाही झाले ते मराठी माणसाचे काय होणार?,मुंबईकर जागा हो,एक परिवाराच्या नादी लागू नको, मुंबईचा रंग बदलू देऊ नको असे पोस्टर मुंबईत अज्ञात व्यक्तीकडून लावले गेले आहेत.यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.(Mumbai Municipal Corporation Election)