Mohammed Rafi Award : ज्येष्ठ संगीतकार ओ. पी नय्यर यांना मरणोत्तर मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्कार जाहीर

गायिका कविता उत्तरा केळकर यांना मोहम्मद रफी पुरस्कार | १९ व्या मोहम्मद रफी पुरस्कारांची आशिष शेलार यांच्याकडून घोषणा

    15-Dec-2025   
Total Views |
Mohammed Rafi Award

मुंबई : (Mohammed Rafi Award) हिंदीमधील अजरामर गाण्‍यांना चाली देऊन संगीत जगतात आपले अढळ स्‍थान निर्माण करणा-या ज्येष्ठ संगीतकार ओ. पी. नय्यर यांना मरणोत्तर यावर्षीचा मोहम्मद रफी जीवन गौरव पुरस्‍कार (Mohammed Rafi Award)  देण्यात येणार आहे. त्याचबरोबर सुप्रसिध्‍द गायिका उत्तरा केळकर यांना सन २०२५ चा मोहम्‍मद रफी पुरस्‍कार  (Mohammed Rafi Award) देण्‍यात येणार असल्‍याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अॅड आशिष शेलार यांनी आज केली. (Mohammed Rafi Award)
 
हेही वाचा : Marathi Literary Conference : साताऱ्याच्या शाहू स्टेडियममध्ये संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ 
 
मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या स्पंदन या संस्थेतर्फे मोहम्मद रफी (Mohammed Rafi Award) यांच्या वाढदिवसा दिवशी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ दरवर्षी एका संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंताला जीवन गौरव व मोहम्मद रफी पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. (Mohammed Rafi Award) पुरस्काराचे हे १९ वे वर्ष असून एक लाख रूपयांचा धनादेश स्मृतीचिन्ह आणि शाल श्रीफळ असे जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप असून, ५१ हजार रूपयांचा धनादेश आणि मानचिन्ह असे रफी पुरस्काराचे (Mohammed Rafi Award) स्वरूप आहे.वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे २४ डिसेंबर रोजी दरवर्षी प्रमाणे हा पुरस्कार वितरण सोहळा संध्याकाळी ६.०० वा. सुरू होणार असून मान्यवरांच्‍या हस्‍ते यावर्षी या पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येणार आहे.(Mohammed Rafi Award)
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.