Pravin Darekar : रोजगार आणि स्वयं रोजगाराच्या माध्यमातून, महिला नव्या भारताची संकल्पना सत्यात उतरवतील
मागाठाणे येथील कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचे प्रतिपादन
15-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Pravin Darekar) रोजगार व स्वयं रोजगाराच्या माध्यमातून नवीन भारताची जी संकल्पना आहे त्यात महिला खऱ्या उतरतील, असे प्रतिपादन वाणिज्य व उद्योग केंद्रीय मंत्री आणि उत्तर मुंबईचे खासदार पियुष गोयल यांनी केले. मागाठाणे उत्तर विधानसभेतर्फे महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी घरघंटी व शिलाई मशीनच्या वाटपाचा कार्यक्रम रविवारी दहिसर, अशोकवन येथे पार पडला. यावेळी भाजपा गटनेते आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांच्या मोबाईलवरून व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून खासदार पियुष गोयल यांनी लाडक्या बहिणींशी संवाद साधला. (Pravin Darekar)
या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, माजी खासदार गोपाळ शेट्टी, भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, भाजपा महामंत्री श्वेता परुळेकर, जिल्हाध्यक्ष बाळा तावडे, उत्तर मुंबई जिल्हाध्यक्षा शीतल आंब्रे, भाजपा उत्तर मुंबई उपाध्यक्षा रश्मी भोसले, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, सोनाली नखुरे, म.भाजपा उत्तर मुंबई उपाध्यक्षा माधुरी रावराणे, उपाध्यक्षा प्रियांका रेडकर, भाजपा उत्तर मुंबई उपाध्यक्षा मिरा वाघेला, उत्तर मागाठाणे वॉर्ड अध्यक्षा वैशाली कावा, सोशल मीडिया प्रमुख माधुरी खुटड, मागाठाणे उत्तर सचिव हसीना शेख, महिला मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षा मृदुला पवार, मागाठाणे उत्तर मंडळाचे महामंत्री आबा जाधव, संयोजक कृष्णकांत दरेकर, सुभाष येरुणकर, मोतीभाई देसाई, कमला राजपुरोहित, सचिन शिरवडकर, ललित शुक्ला, मागाठाणे उत्तर विधानसभा महामंत्री संजय घाडी, जिल्हा अध्यक्ष सहकार अमोल खरात, मागाठाणे युवा मोर्चा अध्यक्ष विनायक राजेंशिर्के, वॉर्ड क्र. ५ चे अध्यक्ष सुरज नवाडकर, आदित्य दरेकर यांसह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या. (Pravin Darekar)
पियुष गोयल म्हणाले कि, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन पक्षाला मजबूत केलेय. एक नवीन उदाहरण निर्माण केलेय. त्यामुळे महिलांना आत्मनिर्भर बनवू शकू, त्यांचे उत्पन्न वाढवू शकू. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिलांना दिशा देण्यासाठी सक्षम बनवणे आपले कर्तव्य असल्याचे म्हटलेय. बेटी बचाओ, बेटी पढाओच्या माध्यमातून आपल्या मुली शाळेत, महाविद्यालयात शिक्षण घेत असून नाव कमवत आहेत. शिलाई मशीनच्या माध्यमातून नवीन डिझाईन बनवणे याचेही शिक्षण देण्याचे काम कांदिवलीतील कौशल्य विकास केंद्रात केले जातेय. लाडक्या बहिणींच्या खात्यात १५०० रुपये प्रतिमहिना देवाभाऊ, शिंदे आणि पवार यांच्या सरकारच्या माध्यमातून पोहोचविण्याचे पुण्य कार्य केले जातेय. देशातील प्रत्येक व्यक्तीचे जीवन उज्वल बनविणे, महिला-युवतीना देशनिर्माण कार्यात पुढे आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सहकार्य व कामाची गती उत्तर मुंबईला आणखी गतिशिलतेने सुशोभीत करेल. उत्तर मुंबई वास्तविकतेत उत्तम मुंबई बनेल व महिला आत्मसन्मानाने उभी राहील, असा विश्वास मंत्री गोयल यांनी यावेळी व्यक्त केला. (Pravin Darekar)
तर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले कि, आमचा पक्ष बारा महिने काम करणारा आहे. महायुती सरकारची सर्वात लोकप्रिय लाडकी बहिण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात. महिला सक्षम झाली तर कुटुंबनिर्भर, आत्मनिर्भर भारत होईल. नगरसेवक, आमदार, खासदार असेल तेही हाच विचार करतात कि माझ्या प्रभागातील, विधानसभा आणि लोकसभा क्षेत्रातील महिलांसाठी काहीतरी करता आले पाहिजे. आज या शिलाई मशीन वाटप कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला निश्चितपणे छोटे मोठे उद्योग करून आपले घर चालवू शकतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. (Pravin Darekar)
तत्पूर्वी आ. दरेकर (Pravin Darekar) आपल्या भाषणात म्हणाले कि, हा कार्यक्रम माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम करताना सातत्याने महिलांच्या उत्कर्षाचा विचार होत असतो. महिलांचे सबलीकरण झाले पाहिजे असे बोलले जाते. परंतु प्रत्यक्षात महिलांसाठी काम होत नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी लाडक्या बहिणींसाठी १५०० रुपये देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. अडचणीच्या काळात महिलांना या निर्णयाचा दिलासा मिळणार आहे. योग्य वेळ आली कि हे सरकार १५०० चे २१०० रुपये केल्याशिवाय राहणार नाही. महिला आर्थिक दृष्ट्या सबळ झाल्या पाहिजेत, त्यांनी छोटे-मोठे व्यवसाय केले पाहिजेत ही मुख्यमंत्री फडणवीस यांची इच्छा होती. मी निर्णय घेतला मुंबई बँकेच्या माध्यमातून शून्य टक्के व्याज दराने महिलांना व्यवसायासाठी कर्ज दिले. ३०० ते ४०० महिलांना आतापर्यंत बिनव्याजी कर्ज दिलेय. येत्या गुरुवारपासून दादर परिसरात महिलांना शिलाई मशीनचे प्रशिक्षण देणार आहे. महिला सशक्त झाल्या पाहिजेत, त्यांना दिशा दिली पाहिजे, आपल्या विभागातून ५०० महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत, तुमच्या मागे सर्व ताकद उभी करू, असा विश्वास देत शिलाई मशीनच्या व्यवसायासाठी कापड, कैची, यंत्रसामुग्री लागेल तीही शून्य टक्के व्याजदराने उपलब्ध करून देऊ असे आश्वस्त केले. (Pravin Darekar)
महायुतीच्या माध्यमातून मागाठाणेचा चेहरामोहरा बदलणार
दरेकर (Pravin Darekar) पुढे म्हणाले कि, महिला बचत गटाच्या माध्यमातून क्रांती होतेय. महिला काय चमत्कार दाखवू शकतात हे देशाने पाहिलेय. हे आव्हान प्र.क्र. ५ व मागाठाणेतील महिलांनी स्वीकारले पाहिजे. मोठ्या प्रमाणावर विकास करू. महायुतीच्या माध्यमातून मागाठाणेचा चेहरामोहरा बदलण्याचे काम करायचेय. गोपाळ शेट्टी यांच्यानंतर पियुष गोयल यांच्यासारखे नेतृत्व आपल्याला लाभलेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आशीर्वाद आणि प्रेम आपल्यासोबत आहे. शिलाई मशीन वाटपासाठी प्रचंड प्रतिसाद मिळतोय. दहा कोटी लागतील. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ कार्यवाही करत १० कोटी देण्याचेही आदेश दिलेत. त्यांच्यासारखा मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला हे आपले भाग्य आहे. इन्फ्रा मॅन म्हणून त्यांची ओळख निर्माण झालीय. केंद्रात आपली सत्ता आहे. पंतप्रधान मोदींचे मुंबईच्या विकासाकडे लक्ष आहे. राज्य म्हणून फडणवीसांचेही मुंबईवर लक्ष आहे. घरघंटी आणि शिलाई मशीनचा योग्य वापर करा. हे सरकार तुमचे आहे. या सरकारमधील महत्वाचा भाग मी आहे. भाजपा उमेदवारांच्या पाठीशी आशीर्वाद उभे करा. मुंबई मनपाची सत्ता भाजपा महायुतीच्या ताब्यात द्या. येणाऱ्या ५ वर्षात मुंबईचा चेहरा मोहरा बदलल्याशिवाय राहणार नाही, असा दृढ विश्वासही दरेकरांनी (Pravin Darekar) व्यक्त केला. (Pravin Darekar)