Madhavbag Mandal : माधवबागमध्ये हळदी-कुंकू समारंभाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

    15-Dec-2025
Total Views |
Madhavbag Mandal
 
मुंबई : (Madhavbag Mandal) मुंबादेवी विधानसभा क्षेत्रातील माधवबाग परिसरात (Madhavbag Mandal) वॉर्ड क्रमांक २२० अंतर्गत आयोजित हळदी-कुंकू समारंभाला परिसरातील महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला. सामाजिक सलोखा आणि महिलांचा सन्मान जपणारा हा उपक्रम सकाळपासून रात्रीपर्यंत रंगतदार वातावरणात पार पडला.(Madhavbag Mandal)
 
माधवबाग मंडळाच्या (Madhavbag Mandal) वतीने शनिवार, १३ डिसेंबर रोजी नागेश्वर मंदिर हॉल, गोल देऊळ, पहिला कुंभारवाडा येथे हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात विभागातील असंख्य सौभाग्यवती महिलांनी सहभाग नोंदविला. परंपरेचा सन्मान राखत महिलांमध्ये आपुलकी, संवाद आणि एकोपा वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.(Madhavbag Mandal)
 
या प्रसंगी मुंबई भाजपा महामंत्री श्वेता परुळेकर आणि अतुल शाह उपस्थित होते. त्यांच्या हस्ते महिलांना हळदी-कुंकवाचे वाण आणि भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात माधवबाग मंडळाच्या (Madhavbag Mandal) अध्यक्ष दिपाली मालुसरे, वॉर्ड क्रमांक २२० चे अध्यक्ष सुशील राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. अशा सामाजिक उपक्रमांमधून महिलांना व्यासपीठ मिळत असून परिसरातील सामाजिक बांधिलकी अधिक मजबूत होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.(Madhavbag Mandal)