मुंबई : (Marathi Literary Conference) महाराष्ट्र साहित्य परिषद, (Marathi Literary Conference) पुणे शाखा - शाहूपुरी ( सातारा) आणि मावळा फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (Marathi Literary Conference) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त संमेलनाच्या मंडप उभारणीचा कार्यक्रम आखण्यात आला आहे. बुधवार दि. १७ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता शाहू स्टेडियम येथे हा कार्यक्रम संपनन होणार आहे. सरस्वती सन्मान प्राप्त, ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते हा कार्यक्रम संपनन होणार आहे. या कार्यक्रमाला ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Marathi Literary Conference) स्वागताध्यक्ष छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपस्थित राहणार आहेत. साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून, प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.(Marathi Literary Conference)
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.