Mahamaya Nilavanti Novel : महामाया निळावंती कादंबरीची २५ वी आवृत्ती प्रकाशित

    15-Dec-2025   
Total Views |
Mahamaya Nilavanti Novel
 
मुंबई : (Mahamaya Nilavanti Novel) साहित्यविश्वामध्ये पुस्तकविक्रीवरुन नैराश्याचे वातावरण असताना, मराठीने मात्र पुन्हा यातून मार्ग काढल्याचे बघायाला मिळते. प्रख्यात लेखक सुमेध यांची महमाया निळावंती या कादंबरीची २५ वी आवृत्ती प्रकाशित झाली आहे. २०२३ साली या कादंबरीची (Mahamaya Nilavanti Novel) पहिली आवृत्ती बाजारात आली होती. यानंतर २५ व्या आवृत्तीनिमित या कादंबरीने (Mahamaya Nilavanti Novel) आता नवीन विक्रम केला आहे असे.
 
या संदर्भात फेसबुक पोस्ट मधून माहिती देताना सुमेध म्हणतात की आज पंचविसावी आवृत्ती आली. म्हणजे पंचवीस हजार घरांत कादंबरी (Mahamaya Nilavanti Novel) पोचली. हे सगळं वाचकांनीच पुस्तक उचलून धरल्यामुळे घडलं. महामाया निळावंती कादंबरी (Mahamaya Nilavanti Novel) प्रकाशित झाल्यानंतर, काही काळाने याबद्दल समाज माध्यमांवर बरीच चर्चा झाली. अनेक वाचकांनी कादंबरीविषयी चांगली वाईट प्रतिक्रिया व्यक्त केली. कादंबरीतील कथानक घटनास्थळ, आदी गोष्टीविषयी समाज माध्यमांवर चर्चा अजूनही सुरू आहे.(Mahamaya Nilavanti Novel)
 
हेही वाचा : Marathi Literary Conference : साताऱ्याच्या शाहू स्टेडियममध्ये संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ
 
कादंबरीच्या (Mahamaya Nilavanti Novel) यशामागचं गमक सांगताना सुमेध म्हणतात की पुस्तकाचं वेगळेपण हे त्याच्या शीर्षकात आहे. लोकांच्या मनामध्ये एकाच वेळेला कुतूहल आणि उत्कंठा निर्माण होते आणि त्यातून पुस्तकाकडे लोक आकृष्ट होतात. त्याचबरोबर वर्ड ऑफ माऊथ अशा पद्धतीने सुद्धा लोकांनी पुस्तक विकत घेतली. प्रामुख्याने या कादंबरीला तरुणवाचक वर्ग मोठ्या प्रमाणात लाभला आहे. आता सुद्धा मोठ्या प्रमाणात वाचकांच्या प्रतिक्रिया येतात. लोकप्रिय कादंबऱ्यांचा एक विशिष्ट साचा आहे, त्याला बगल देत महामाया निळावंती एक वेगळी गोष्ट लोकांच्या समोर मांडते आहे आणि म्हणूनच कदाचित ती लोकप्रिय ठरली असे मत सुमेध यांनी मांडले. महामाया निळावंतीनंतर (Mahamaya Nilavanti Novel) अजातशत्रू ही त्यांची कादंबरी (Mahamaya Nilavanti Novel) प्रकाशित झाली व सध्या ते एका सायन्स फिक्शन कादंबरीवर काम करत आहेत.(Mahamaya Nilavanti Novel)
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.