Rashtriya Swayamsevak Sangh : केवळ एक संघटित समाजच राष्ट्राला परम वैभवापर्यंत पोहोचवू शकतो

संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांचे प्रतिपादन

Total Views |
Rashtriya Swayamsevak Sangh
 
मुंबई : (Rashtriya Swayamsevak Sangh) बदलत्या भारतात समाजाचे मन आणि इच्छाशक्तीला महत्त्वाचे स्थान आहे. आपल्या राष्ट्राला परम वैभवापर्यंत पोहोचवण्याचे महत्वाचे कार्य केवळ एक संघटित समाजच करू शकतो, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी व्यक्त केले. संघ शताब्दी वर्षानिमित्त देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. (Rashtriya Swayamsevak Sangh)
 
यानिमित्ताने राजस्थानच्या जोधपूर महानगरातील भाग क्रमांक २ मध्ये विचारवंत आणि बुद्धीजीवींसाठी प्रमुख जनगोष्ठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी सरकार्यवाह बोलत होते. ते म्हणाले की, विकसित भारतासाठी केवळ आर्थिक विकासच नाही तर नागरीकांची कर्तव्य आणि शिस्तबद्ध जीवनशैली देखील आवश्यक आहे. (Rashtriya Swayamsevak Sangh)
 
हेही वाचा : Devendra Fadnavis : फुटबॉलमध्येही जगात आपले नाव कोरण्याचा भारताचा GOAL! ; मुख्यमंत्री फडणवीस 
 
ते पुढे म्हणाले की, संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) समाजाला जागृत करण्यासाठी आणि एकत्र आणण्यासाठी काम करत आहे. समाजाच्या सहकार्यानेच हे सर्व होत असल्यामुळेच आज देशात अनेक मोठे बदल शक्य होत आहेत. जर समाज संघटित असेल तर देश घडवण्यासाठी जास्त काळ जाणार नाही. (Rashtriya Swayamsevak Sangh)
 
डॉ. हेडगेवार यांच्या विचारांवर प्रकाश टाकत त्यांनी स्पष्ट केले की, संघाच्या (Rashtriya Swayamsevak Sangh) शाखांची संकल्पना व्यक्तीला वैयक्तिक चारित्र्यापासून राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याच्या ध्येयाने करण्यात आली होती. गेली शंभर वर्ष संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) याच एका ध्येयाने कार्य करत आहे. यावेळी जोधपूर महानगर संघचालक प्रकाश जिरावाला व्यासपीठावर उपस्थित होते. (Rashtriya Swayamsevak Sangh)
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.