मुंबई : (Dr. Ramvilas Das Vedanti) अयोध्येतील श्रीराम मंदिर आंदोलनातील एक अग्रगण्य व्यक्तिमत्व माजी खासदार आणि संत डॉ. रामविलास दास वेदांती (Dr. Ramvilas Das Vedanti) यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. मध्य प्रदेशातील रीवा येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दि. १० डिसेंबर रोजी संत वेदांती (Dr. Ramvilas Das Vedanti) रीवा येथे रामकथा सांगण्यासाठी पोहोचले होते. त्याच दरम्यान अचानक त्यांची प्रकृती बिघडली. दिल्लीहून एअर अँब्युलन्स मागवण्यात आली होती, मात्र दाट धुक्यामुळे ती लँड होऊ शकली नाही. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. सध्या त्यांचे पार्थिव रीव्यातील आश्रमात ठेवण्यात आले असून लवकरच ते अयोध्येला नेण्यात येणार असल्याचे त्यांचे उत्तराधिकारी महंत राघवेश दास वेदांती यांनी सांगितले. (Dr. Ramvilas Das Vedanti)
डॉ. वेदांती राम (Dr. Ramvilas Das Vedanti) जन्मभूमी आंदोलनाच्या सुरुवातीपासूनच सक्रिय होते. ते राम जन्मभूमी न्यासचे सदस्य होते आणि आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ मानले जात होते. ते अयोध्येतील हनुमानगढीचे महंत अभिराम दास यांचे शिष्य होते. अनेक वर्षे त्यांनी रामललाच्या समोर तसेच हनुमानगढीत रामकथा सांगितली. ते संस्कृतचे थोर विद्वान होते आणि रामभक्तीचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवत असत. ते भाजपच्या तिकिटावर खासदार राहिले होते. अयोध्येतील वशिष्ठ भवन आश्रम हे त्यांचे निवासस्थान होते. हिंदू धाम, नया घाट येथेही त्यांचे ठिकाण होते. राम मंदिरासाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आणि आंदोलनाला बळ दिले. अनेक जण त्यांना या आंदोलनातील अग्रणी संत मानत होते. (Dr. Ramvilas Das Vedanti)
डॉ. वेदांती (Dr. Ramvilas Das Vedanti) हे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख स्तंभ आणि एक समर्पित संत होते. त्यांचे निधन (Dr. Ramvilas Das Vedanti) हे आध्यात्मिक जगताचे आणि सनातन संस्कृतीचे नुकसान आहे. त्यांच्या जाण्याने एका युगाचा अंत झाला. धर्म, समाज आणि राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित त्यांचे त्यागाचे जीवन आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि त्यांच्या शिष्यांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो. (Dr. Ramvilas Das Vedanti)
'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक