CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आर्थिक शिस्तीचा ठसा

महावितरणचा १२,८०० कोटींचा कर्जबोजा संपला, महावितरणला आर्थिक बळ, ग्राहकांना दिलासा

Total Views |
CM Devendra Fadnavis
 
मुंबई : (CM Devendra Fadnavis) राज्यातील आर्थिक शिस्त मजबूत करत सर्वसामान्य वीजग्राहकांना दिलासा देण्याच्या दिशेने मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis)  यांनी मोठे पाऊल उचलले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाच्या १२,८०० कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतीआधी एकाच हप्त्यात परतफेड करून इतिहास घडविला आहे.(CM Devendra Fadnavis)
 
या निर्णयामुळे महावितरणवरील कर्जाचा बोजा लक्षणीयरीत्या हलका झाला असून, भविष्यात वीजदर कमी करण्यासाठी आवश्यक आर्थिक मोकळीक कंपनीला मिळणार आहे. उच्च व्याजदराच्या कर्जातून मुक्तता मिळाल्याने कोट्यवधी रुपयांची व्याज बचत होणार असल्याची माहिती महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी दिली.(CM Devendra Fadnavis)
 
महावितरण कर्जमुक्त झाल्याने महसूल तारणमुक्त
 
महावितरणने यापूर्वी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ८.६५ ते ९.२५ टक्के व्याजदराने कर्ज घेतले होते. मुख्यमंत्री फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या आर्थिक पुनर्रचनेमुळे ८.२५ टक्के इतक्या कमी व्याजदराने ७,१०० कोटी रुपयांचे नवीन कर्ज उभारून तेवढेच कर्ज फेडण्यात आले. त्याचबरोबर कंपनीने स्वतःच्या निधीतून ५,६३४ कोटी रुपये अदा करून संपूर्ण कर्ज निकाली काढले. या कर्जासाठी महावितरणच्या दहा सर्कलमधील महसूल तारण ठेवण्यात आला होता. या सर्कलमधून दरवर्षी सुमारे ३० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. आता कर्जमुक्त झाल्याने हा महसूल तारणमुक्त झाला असून, भविष्यात ५० हजार कोटी रुपयांपर्यंतचा निधी माफक व्याजदरात उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.(CM Devendra Fadnavis)
 
हेही वाचा : CM Devendra Fadnavis : राष्ट्रवादी विरुद्ध भाजप! महापालिकांसाठी पुण्यात होणार मैत्रीपूर्ण लढत! 
 
महावितरणची वित्तीय बाजारात पत वाढली
 
एकाच वेळी एवढ्या मोठ्या रकमेची मुदतपूर्व कर्जफेड ही महावितरणच्या इतिहासातील महत्त्वाची कामगिरी मानली जात आहे. यामुळे वित्तीय बाजारात कंपनीची पत वाढली असून, गुंतवणूकदारांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वाखाली घेतलेला हा निर्णय म्हणजे महावितरणला आर्थिक बळ आणि वीजग्राहकांना भविष्यात दिलासा देणारा ठरणार आहे.(CM Devendra Fadnavis)
 
राज्याच्या आर्थिक मजबुतीकडे ठाम पाऊल
 
राज्याच्या आर्थिक मजबुतीच्या दिशेने आणखी एक पाऊल उचलण्यात आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या आदेशानुसार महावितरणने स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले ₹१२,८०० कोटींचे कर्ज वेळेआधी आणि एकाच हप्त्यात परतफेड करण्यात आले आहे. यामुळे महावितरणची आर्थिक स्थिती आणखी चांगली होण्याच्या दिशेने हे हा एक महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.(CM Devendra Fadnavis)
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री
 
दरकपातीमागची आर्थिक रणनीती
 
मा.राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) हे २०२२पासून सलग महाराष्ट्राचे ऊर्जामंत्रीदेखील आहेत. त्यांचा प्रयत्न विजेचे दर कमी कसे करता येईल यावर आहे. यासाठी सर्व प्रकारच्या किमती कमी करण्यावर त्यांचा भर आहे. त्याचाच भाग म्हणून महावितरणवरील आर्थिक भार आणि त्याच्यावरील व्याज कमी करणे हे देखील वीजेचे दर कमी करण्याचाच एक भाग आहे.(CM Devendra Fadnavis)
- विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनी
  

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.