नृत्यदर्पणच्या माध्यमातून स्फूर्ती नृत्यमहोत्सवाचा जागर

शास्त्रीय नृत्यमहोत्सावाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

    14-Dec-2025   
Total Views |

 Spoorthi Dance Festival
( छाया : केतन फुंगुस्कर )
 
मुंबई : ( Spoorthi Dance Festival ) नृत्यदर्पण अकादमी ऑफ फाइन आर्ट्सच्या प्रस्तूत, शक्ती व्हेकेशन प्रायव्हेट लिमिटेड, एलआयसी, स्मृतिगंध प्रायोजित ' स्फूर्ति' या आगळ्या वेगळ्या नृत्यमहोत्सवाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. दि. १३ डिसेंबर रोजी सायंकाळी दादरच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहामध्ये हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला कथ्थक गुरु डॉ. मंजिरी देव, सिरमॅक्सो केमिकल्सच्या कार्यकारी संचालक डॉ. कल्पना भाटवडेकर, प्युअर ओरिजीन्स बाय निरगुडकर फार्म्सच्या संस्थापक डॉ. मंजिरी निरगुडकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
 
या कार्यक्रमामध्ये ३० हून अधिक नृत्य सादरीकरणं बहरली, ज्यांच्या माध्यमातून भारतीय शास्त्रीय नृत्याचा एका विलक्षण आविष्कार लोकांसमोर उलगडला. कथ्थक, मोहिनीअट्टम, ओडिसी, कुचीपुडी अशा वेगवेगळ्या माध्यमातून सर्व वयोगटातील नृत्यांगणांनी अनोखे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संध्या दामले म्हणाल्या की स्फूर्ती म्हणजे नृत्यदर्पण कुटुंबाची तपश्चर्य आहे. मागचा वर्षभर या कार्यक्रमासाठी आम्ही सगळेजण झटत होतो. नृत्याला वाहून घेतलेल्या कलाकारांना बळ मिळावे यासाठी आम्ही हा प्रयत्न करतो. नृत्यदर्पणच्या या उपक्रमाला आशीर्वाद देत डॉ. मंजिरी देव म्हणाल्या की “ स्फूर्ती च्या माध्यमातून दरवर्षी नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळते. मागच्या दोनवर्षापासून या कार्यक्रमाला प्रेक्षाकांचा सुद्धा उदंड प्रतिसाद लाभला आहे. येणाऱ्या काळात हा कार्यक्रम असाच समृद्ध होवो यासाठी शुभेच्छा. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश गडकर आणि सौरभ नाईक यांनी दिले.
 
हेही वाचा : Kerala : केरळमध्ये डाव्यांचा गड कोसळला; तिरुअनंतपुरम महानगरपालिकेत पहिल्यांदाच एनडीए विजयी
 
वंदे मातरम ने वेधले सगळ्यांचे लक्ष्य
 
वंदे मातरम या गीत रचनेच्या १५० व्या वर्षपूर्ती निमित्त सध्या देशभरात समूह गीत गायन होत असल्याचे आपल्याला बघायाला मिळते. अशातच स्फूर्ती नृत्यमहोत्सवामध्ये ‘नृत्यदर्पण’च्या विद्यार्थांनी तथा प्रख्यात नृत्यांगणा संध्या दामले यांनी वंदे मातरम गीतावर शास्त्रीय नृत्य सादर केले. त्यांच्या या सादरीकरणाला प्रेक्षकांनी मनसोक्त दाद दिली, तसेच त्यांचे व विद्यार्थ्यांचे भरभरुन कौतुक केले.
 
 

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.