Gurav Community : पारंपरिक हक्कदार व्यवस्थापक शब्द काढल्याने मंदिर उपासक गुरव पुजारी नाराज.
सरकारने दुरुस्ती न केल्यास पुकारणार एल्गार!अखिल गुरव समाजाचा इशारा!
13-Dec-2025
Total Views |
मुंबई : (Gurav Community) पारंपरिक मंदिर संस्कृती उपासक गुरव ब्राम्हण पुजारी सेवेकरी (Gurav Community) हे धार्मिक व्यवस्थापक आणि त्यांचे हक्क परंपरेने तेही सनद सारख्या सरकारी कागद पत्रातही जतन केलेला शब्द कायद्याने वगळून मंदिर संस्कृती व्यवस्थापन उपासकांच्या हक्कावर घाला घालण्याचे काम देव देश मंदिर संस्कृती रक्षक म्हणून घेणाऱ्या शासनाने केल्याने हे मंदिर संस्कृतीला घातक असल्याची खंत समाजातील गुरव संस्कृती अभ्यासक प्रा राजेंद्र गुरव यांनी व्यकत केली असून अखिल गुरवपूजारी ब्राम्हण सेवेकरी (Gurav Community) वर्गाने नाराजी व्यकत केली आहे. सरकारच्या नजर चुकीने झालेल्या चुकीची दुरुस्ती न झाल्यास समस्त गुरव समाज रस्त्यावर उतरून सरकार विरोधात एल्गार पुकारेल असा इशारा दिला आहे,महाराष्ट्र राज्यातील महत्वपूर्ण तीर्थक्षेत्र असलेल्या जेजुरीगडावर राजेंद्र गुरव येऊन त्यांनी येथील समस्त गुरव कोळी वीर घडशी ब्राम्हण आणि सेवेकरी यांच्याशी संवाद साधला यावेळी जेजुरी गुरव समाज अध्यक्ष माधव बारभाई, मिलिंद शिरसागर सदानंद बारभाई,रेवनाथ आगलावे, प्रशांत सातभाई, धनंजय आगलावे मयूर दीडभाई, बाळासाहेब दीडभाई, गौतम हरिश्चंद्रे सचिन गुरव,हनुमंत लांघी सचिन मोरे, सुधाकर मोरे इत्यादी मान्यवर उपस्तिथ होते याकरिता कायदेशीर अभ्यासक रवींद्र क्षीरसागर विजयकुमार क्षीरसागर, योगीनाथ फुलारी प्रवीण राजगुरू, हे विशेष कामकाज पाहत असून ते राज्यव्यापी दौरा करीत आहेत. या प्रसंगी देवसंस्थांना चे पी आर ओ सागर गोडसे आणि महेश शिंदे, दादा खोमणे यांनी ट्रस्टच्या वतीने त्यांचे स्वागत केले.(Gurav Community)
महाराष्ट्र आध्यदेश क्र ७२,०१५ प्रमाणे वगळलेला व्यवस्थापक शब्द पुन्हा जशाचा तसा पुनर्जीवीत करावा आणि मंदिर संस्कृती उपासक गुरव, (Gurav Community) ब्राम्हण, तेली अन्य समाजा सह राज्यातील तसेच कर्नाटक, कोकण सह अन्य राज्यतील जंगम, गोसावी, लिंगायत, कोळी यांची पिड्यानपिड्या वंश परमपंरागत व्यवस्थापक प्रणाली साठी मंदिर (Gurav Community) व्यवस्थापक शब्द असणे आवश्यक असून शासनाने या बाबत त्वरित दुरुस्ती करावी या बाबत महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, तसेच आमदार महेश लांडगे यांना राष्ट्रीय गुरव महासंघ नेते विजयराव शिंदे, बाळासाहेब क्षीरसागर, गुरव फेडरेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजयकुमार पोरे, आणि अखिल गुरव समाज राज्य अध्यक्ष अण्णा शिंदे, सातारा गुरव संघटक अध्यक्ष नानासाहेब गुरव शैव संस्कृती उपासक अध्यक्ष पुणे चे ज्ञानेश्वर गुरव,यांनी निवेदना द्वारे विनंती केली आहे. (Gurav Community)