Shanti Orphanage : चर्चअंतर्गत अनाथाश्रमातील प्रकरणात आरोपींच्या शिक्षा कायम

Total Views |
 
Shanti Orphanage
 
मुंबई : (Shanti Orphanage) रायगड येथील शांती अनाथाश्रमात अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी ख्रिश्चन राजेंद्रनला देण्यात आलेली १४ वर्षांच्या तुरुंगवासाची तर त्याचा भाऊ जॉय याला १० वर्षांची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. हे अनाथआश्रम (Shanti Orphanage) चर्च ऑफ एव्हरलास्टिंग लाईफ अँड सोशल वेल्फेअर ट्रस्टच्या अंतर्गत चालवण्यात येते.
 
न्यायालयात आरोपींच्या वकिलांनी असा दावा केला की, जर अशा काही घटना घडल्या असतील तर मुलींनी तक्रार करायला एवढा उशिर का केला? न्यायमूर्तींनी त्यांचा दावा फेटाळून लावत सांगितले की, मुली निवारा, अन्न आणि कपड्यांसाठी अनाथाश्रमावर अवलंबून होत्या, म्हणून त्यांनी आधी तक्रार न करणे स्वाभाविक होते. (Shanti Orphanage)
 
हेही वाचा :  Osman Hadi : बांग्लादेशातील कट्टर इस्लामवादी उस्मान हादीवर अज्ञातांकडून हल्ला
 
न्यायालयाने पुढे सांगितले की, अनाथाश्रमात राहणाऱ्या एका मुलीने शाळेतील तिच्या वर्गशिक्षिकेला ही गोष्ट सांगितली तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर मुलींना अनाथाश्रमातून काढून सुरक्षित ठिकाणी ठेवल्यानंतरच त्यांनी सर्व घटना सांगितल्या. त्यांची घेण्यात आलेली साक्ष स्पष्ट करते की, त्यांच्यावर दीर्घकाळ अत्याचार करण्यात आलेत. (Shanti Orphanage)
 
काय आहे प्रकरण?
 
चर्चअंतर्गत चालणाऱ्या शांती अनाथाश्रमात (Shanti Orphanage) ख्रिश्चन राजेंद्रन आणि जॉय व्यवस्था पाहत होते. त्यांनी २०१५ मध्ये अनाथाश्रमातील १५ अल्पवयीन मुलींवर अत्याचार केले होते. २०२० मध्ये पनवेल सत्र न्यायालयाने आरोपींना अनुक्रमे १४ आणि १० वर्षांची शिक्षा सुनावली होती, तर त्यांच्या आईला गुन्हा लपवल्याबद्दल एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली होती. (Shanti Orphanage)
 
 

चारूदत्त टिळेकर

बारामती येथील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात वाणिज्य विषयामध्ये पदवीचे शिक्षण. पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूट येथून संज्ञापण आणि वृत्तपत्रविद्येमध्ये पदव्युत्तर पदवी. अनेक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग. रानडे इन्स्टिट्यूट येथे 'पश्चिम महाराष्ट्रातील वक्तृत्व स्पर्धांची परंपरा, समस्या आणि परिणाम' या विषयात सखोल अहवाल सादर. सध्या मुंबई तरुण भारत येथे पत्रकार म्हणून कार्यरत.